Vastu Tips sakal
लाइफस्टाइल

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार किचन मधील तव्याविषयी या गोष्टी कटाक्षाने पाळा... जाणून घ्या

घरातील महिला ज्या ठिकाणी सर्वाधिक वेळ घालवतात ते स्वयंपाकघर.

Aishwarya Musale

भारतीय संस्कृती, परंपरा यांमध्ये अनेक गोष्टींना महत्त्व आहे. आपली वास्तू ही आपल्यासाठी खूप महत्वाची असते. आपण ज्या घरात राहतो, ते नीटनेटके ठेवण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो. कोणत्याही घरातील महत्त्वाची जागा म्हणजे स्वयंपाकघर वा आधुनिक भाषेतील किचन.

वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशेपासून ते कोणत्या दिशेला कोणती वस्तू ठेवावी इथपर्यंत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. इतकंच नव्हे तर वास्तुशास्त्र आयुष्यातील अशा अनेक गोष्टींबाबत मार्गदर्शन सुद्धा करते. आपल्या भारतीय कुटुंबांमध्ये स्वयंपाक घराला आणि तिथल्या प्रत्येक भांडे, वस्तू यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे.

अशीच एक स्वयंपाक घरातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे तवा. तव्याचा वापर प्रत्येक घरात दररोज केला जातो. याच तव्याचा वापर कसा करायला हवा? तो स्वयंपाक घरात कोणत्या दिशेला ठेवायला हवा? या विषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

1. गरम तापलेल्या तव्यावर चुकूनही पाणी टाकू नका. आपण अनेकदा ऐकलं असेल की गरम तव्यावर पाणी टाकणे अशुभ मानले जाते. गरम तव्यावर पाणी टाकल्यास घरात विपरीत घटना घडू शकते.

2. वास्तु शास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकल्याने चरचर असा आवाज येतो. या आवामुळे घरात नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते. आणि या नकारात्मक ऊर्जेचा घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

3. खरंतर तव्याचा संबंध राहू ग्रहाशी आहे, त्यामुळे तव्याचा योग्य पद्धतीने वापर न केल्यास राहू ग्रहाचे अशुभ परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. त्यामुळे तवा नेहमी स्वच्छ करून व्यवस्थित जागी ठेवावा.

4. वास्तु शास्त्रानुसार तवा स्वयंपाक घरात नेहमी अशा जागी ठेवावा, जिथे बाहेरच्या व्यक्तीची नजर त्यावर पडणार नाही.

5. तवा नेहमी आडवा ठेवावा, त्याला कधीही उभा करून ठेवू नये.

6. तवा कधीही अशुद्ध अवस्थेत ठेवू नये. याचा वापर पूर्ण झाल्यानंतर तो नेहमी स्वच्छ करून ठेवावा. नाहीतर घरात दरीद्रता येते.

7. तव्यावर पोळी किंवा भाकरी भाजण्याआधी त्यात थोडे मीठ टाकावे, असं केल्यास घरात कधीही धन-धान्याची कमतरता भासत नाही.

8. रात्री तवा घासु नये असे देखील वास्तुशास्रात सांगितले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, धारदार शास्त्राने वार करत...; शिवसेना आमदारावर हल्ल्याचा आरोप

Abhijeet Dipke: मोठी बातमी! ३ सेकंदात ४ थप्पड... कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपकेंवर हल्ला; जमावाकडून तरुणाला मारहाण, काय घडलं?

Pune Crime: शेअर रिक्षातील गर्दीचा फायदा घेत ज्येष्ठ महिलेची एक लाखांची सोनसाखळी लंपास

Pune Fraud: वाघोलीत बनावट जिल्हाधिकारी व तहसीलदार आदेश प्रकरण उघड: शेतजमीन नोंदणीसाठी शासनाची फसवणूक

Pune Crime : येरवड्यात आरडाओरड्याचा जाब विचारल्याने तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, आरोपी शोएब कुरेशी अटकेत

SCROLL FOR NEXT