actress parna pethe sakal
लाइफस्टाइल

ऐकते गूज तुझ्या मनीचे...

मला मानसिक आरोग्य आणि मानसोपचाराच्या अभ्यासाची आवड आहे. आता याला छंद म्हणावं की नाही, मला माहीत नाही; पण अभिनयाव्यतिरिक्त मला या क्षेत्रात काम करायला आवडतं.

सकाळ वृत्तसेवा

- पर्ण पेठे

मला मानसिक आरोग्य आणि मानसोपचाराच्या अभ्यासाची आवड आहे. आता याला छंद म्हणावं की नाही, मला माहीत नाही; पण अभिनयाव्यतिरिक्त मला या क्षेत्रात काम करायला आवडतं. माझ्या महाविद्यालयीन जीवनापासूनच मला या विषयाची आवड लागली. मी बारावीत असल्यापासून नाटकात काम करू लागले; पण माझ्या आई-बाबांना जेव्हा माझ्या या मानसशास्त्राच्या आवडीबद्दल कळलं, तेव्हा त्यांनी मला पाठिंबा दिला.

मला सातत्याने या विषयाबद्दल अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. या क्षेत्रातल्या अनेक जणांशी त्यांनी माझी ओळख करून दिली. मानसशास्त्रविषयक पुस्तकं वाचायला आणून दिली. विविध कार्यक्रमांना ते मला घेऊन जाऊ लागले. आई-बाबांनी मला या क्षेत्रातले विविध अनुभव दिले. मी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत होते, त्यावेळी पदवी शिक्षणाला मी सायकॉलॉजी हा विषय घेतला होता.

या विषयाचा जसजसा अभ्यास करू लागले, तसतशी या विषयातील गोडी अधिक वाढू लागली. त्यानंतर माझा या क्षेत्रातील काही तज्ज्ञांशी संपर्क आला आणि मला हा विषय अधिक खोलात जाऊन जाणून घेण्याची इच्छा होऊ लागली. फर्ग्युसन कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ. मेघा देऊस्कर, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वासुदेव परळीकर आणि आर्ट बेस्ड थेरपिस्ट आनंद चाबुकस्वार यांच्यामुळे मला या विषयाची व्याप्ती कळली आणि या विषयासाठी मला प्रत्यक्ष काम करता आलं.

मी पुढे क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. मी पदवी परीक्षेत फर्ग्युसन कॉलेजमध्ये पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाले होते. त्या काळात मी अभिनयाच्या क्षेत्रात पूर्णवेळ काम करेन, असं माझं काहीच ठरलं नव्हतं. म्हणून मी याच क्षेत्रात पुढे आणखी शिकायचं ठरवलं. म्हणूनच मी या विषयात एमए केलं. पुण्यातल्या केईएम रुग्णालयात मी काही काळ इंटर्नशीपही केली आहे.

कोरोना काळात मी ऑनलाइन मोफत समुपदेशनासाठी एक हेल्पलाइनही सुरू केली होती. २५ प्रशिक्षित समुपदेशकांना सोबत घेऊन मी हा उपक्रम राबवला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी शारीरिक स्वास्थ्यासोबत मानसिक आरोग्य जपणं किती महत्त्वाचं आहे हे जाणवलं. त्या काळात एकमेकांसोबत असणं फार महत्त्वाचं होतं.

हेल्पलाइनच्या माध्यमातून अनेक स्तरांतल्या लोकांची दुःखं, समस्या जाणून घेता आल्या, त्यांना मदत करता आली. माणसं अधिक चांगल्या पद्धतीने समजावून घेता आली. मानसिक आरोग्याच्या चांगल्या आणि अधिकृत सुविधा कमीत कमी दरात सर्वांसाठी उपलब्ध असाव्यात, असं मला वाटतं. पुढे मी, आलोक, अनुपम बर्वे, मैत्रेयी कुलकर्णी आम्ही सर्व सहकाऱ्यांनी मिळून तरुणांच्या मानसिक आरोग्याबद्दल ‘गोष्ट आहे पृथ्वीमोलाची’ या मालिकेची निर्मिती केली.

ही मालिका यू-ट्यूबवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षी पुण्यातल्या झोन ३ च्या पोलिसांसाठी डीसीपी पौर्णिमा गायकवाड आणि अन्य सहकाऱ्यांसोबत पोलिसांच्या मानसिक आरोग्यासंदर्भात संशोधन आणि काम केलं. मी मॉरिस फाउंडेशनच्या ऑटिझमवरच्या एका पुस्तकाचा मराठीत अनुवादही केला आहे. या छंदामुळे माझ्या आयुष्यात काही लक्षणीय बदल झाले.

चांगलं ऐकण्याचं (active listening) प्रशिक्षण मिळालं. समोरच्या व्यक्तीला पटकन जज न करता, ती व्यक्ती तसं का वागत, बोलत असेल याचा सखोल विचार करण्याची सवय लागली. अनेक भावनांशी नव्यानं ओळख झाली. या सगळ्या प्रक्रियेत स्वतःला आणि समाजाला समजावून घेण्यासाठी मदत झाली आणि ती अजूनही होत आहे. भविष्यात पूर्णवेळ, अगदी थेट काम करणं जरी नाही जमलं, तरी या विषयाशी निगडित काही ना काही काम मी सतत करतच राहणार आहे.

(शब्दांकन : वैष्णवी कारंजकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Bhoom Crime : भूममध्ये कत्तलीसाठी जाणारी १६ जणावरे पकडली, आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

Lungs Health Tips: थोडं चाललं तरी धाप लागते? श्वास घेताना त्रास होतोय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले ५ सोपे घरगुती उपाय!

Bike Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ जण ठार, तर ३ जण जखमी

SCROLL FOR NEXT