Healthy Drinks for Joint Pain
Healthy Drinks for Joint Pain esakal
लाइफस्टाइल

Healthy Drinks for Joint Pain : सांधेदुखीमुळे हालचाल करणे कठीण झालेय? मग, आहारात 'या' हेल्दी ड्रिंक्सचा करा समावेश

Monika Lonkar –Kumbhar

Healthy Drinks for Joint Pain : वाढत्या वयाबरोबर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. मधुमेह, सांधेदुखी, पोटाच्या समस्या, हृदयरोग इत्यादी अनेक समस्यांचा त्यामध्ये समावेश आहे. सांधेदुखी ही त्यापैकीच एक गंभीर समस्या आहे, ज्या समस्येला आजकाल अनेक लोक बळी पडत आहेत.

केवळ वयोवृद्धच नाही तर आजकाल तरूणाईमध्ये देखील हे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे, उठणे, चालणे आणि बसणे देखील कठीण झाले आहे. सांधेदुखीची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही सोप्या उपायांची मदत घेऊ शकता.

सांधेदुखीची समस्या कमी करण्यासाठी आपण हायड्रेटेड राहणे आणि पोषकघटकांनी युक्त असलेली पेये (Healthy Drinks) पिणे महत्वाचे आहे. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला सांधेदुखी कमी करण्यासाठी महत्वाच्या आणि आरोग्यदायी असणाऱ्या काही हेल्दी ड्रिंक्सबद्दल सांगणार आहोत. कोणते आहेत हे हेल्दी ड्रिंक्स? चला तर मग जाणून घेऊयात. (Healthy Drinks for Joint Pain)

दूध

दुधाला कॅल्शिअम आणि प्रथिनांचा समृद्ध स्त्रोत म्हणून ओळखले जाते. दुधामध्ये कॅल्शिअमसोबतच, व्हिटॅमिन्स आणि प्रथिनांचे भरपूर प्रमाण आढळून येते. आपल्या हाडांना मजबूत करण्यासाठी आणि त्यांच्या चांगल्या विकासासाठी दूध अतिशय फायदेशीर मानले जाते.

त्यामुळे, सांधेदुखीची समस्या असणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या आहारात दुधाचा जरूर समावेश करावा. दुधाचे नियमितपणे सेवन केल्याने सांधेदुखी कमी होऊन हाडे मजबूत होण्यास मदत होते. (Milk)

ग्रीन टी

आजकाल ग्रीन टी हा अनेकांच्या मॉर्निंग रूटीनचा एक महत्वाचा भाग झाला आहे. अनेक जण वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी ची मदत घेतात. मात्र, वजन कमी करण्यासोबतच सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर आहे.

ग्रीन टीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलिफेनॉल्स आढळतात. ज्याचा प्रभाव हा अँटि-इंफ्लेमेंटरी असतो, ते ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतात. शिवाय, तुमच्या सांध्यांमधी जळजळ कमी करण्याचे काम करतात. यासोबतच ग्रीन टी मुळे आपले शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते. (Green Tea)

चेरीचा ज्यूस

चेरी हे फळ खायला सर्वांनाच आवडते. चेरीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वांचा समावेश आढळून येतो. त्यामुळे, चेरी ही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. अँटिऑक्सिडंट्स आणि अँटि-इंफ्लेमेंटरी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या चेरीचा ज्यूस(रस) सांध्यांसाठी फायदेशीर मानला जातो.

त्यामुळे, चेरीचा ज्यूस प्यायल्याने सांध्यांची सूज कमी होण्यास मदत होते आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो. ज्या लोकांना सांधेदुखीची समस्या आहे, अशा लोकांनी त्यांच्या आहारात चेरी, चेरीचा ज्यूस यांचा जरूर समावेश करावा. (Cherry Juice)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT