Radhika Merchant Vidai Look  esakal
लाइफस्टाइल

Radhika Merchant Vidai Look : सोन्यासारख्या लेकीची सोन्याच्या लेहेंग्यात पाठवणी.! राधिकाचा रॉयल लूक व्हायरल

Radhika Merchant Vidai Look : ब्रायडल लूकनंतर आता राधिकाचा विदाई लूक समोर आला आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Radhika Merchant Vidai Look : मुकेश अंबानी आणि नीता अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी नुकताच राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकला आहे. हे कपल शुक्रवारी (१२ जुलैला) मुंबईत विवाहबंधनात अडकले. लग्नानंतरचा राधिकाचा फर्स्ट ब्रायडल लूक समोर आला होता. त्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. तिने स्पेशल गुजराती ब्रायडल लेहेंगा लग्नात परिधान केला होता.

ब्रायडल लूकनंतर आता राधिकाचा विदाई लूक समोर आला आहे. पाठवणी करताना राधिकाने फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने डिझाईन केलेला सुंदर लाल-गोल्डन रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. या विदाई लूकमधील तिचे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिचा हा विदाई लूक कसा होता? चला तर मग जाणून घेऊयात.

राधिकाचा स्पेशल विदाई लूक

राधिकाने साध्या आणि क्विन स्टाईलच्या वेडिंग लेहेंग्यामध्ये एन्ट्री केली होती. तिच्या या वेडिंग लूकने एक नवा ट्रेंड सेट केला आहे. या ब्रायडल लूकसोबतच आता राधिकाच्या विदाई लूकची अर्थात तिने पाठवणी करताना घातलेल्या लेहेंग्याची चर्चा होताना दिसत आहे. तिच्या या विदाई लूकचे फोटो प्रसिद्ध फॅशन स्टायलिस्ट आणि निर्माती रिया कपूरने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

विदाईच्या सोहळ्यामध्ये राधिकाने सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने डिझाईन केलेला लाल-सोनेरी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. विशेष बाब म्हणजे तिचा हा लेहेंगा अस्सल सोन्याचा होता. या लेहेंग्यावर सोन्याचे जरदोसी वर्क केले असून तिने सोन्याचे वर्क असलेला करचोबी ब्लाऊज परिधान केला होता.  

लेहेंग्याची डिझाईन

तिच्या या लेहेंग्याच्या डिझाईनची आयडिया गुजरातच्या कच्छमधील पारंपारिक आभो (कुर्ता) आणि विविध परंपरांमधून घेण्यात आली होती.

राधिका मर्चंट

राधिकाने या सुंदर लेहेंग्यावर बनारसी ब्रोकेडचा दुपट्टा घेतला होता. यासोबतच तिने लाल आणि सोनेरी रंगाची ओढणी देखील कॅरी केली होती. या संपूर्ण लूकमध्ये राधिका अप्रतिम दिसत होती.

राधिकाचा ज्वेलरी लूक

राधिकाने हा स्पेशल विदाई लूक पूर्ण करण्यासाठी त्यावर साजेसे मॅचिंग दागिने घातले होते. तिने खास प्रकारची ज्वेलरी या लेहेंग्यावर घातली होती. केसांवर तिने गजरे माळले होते.

राधिका मर्चंट

लेहेंग्यावर राधिकाने हेव्ही चोकर, नेकलेस, मांगटिका, मॅचिंग कानातले आणि हेव्ही बांगड्या परिधान केल्या होत्या. या लूकला साजेसा मिनिमल मेकअप आणि तिचे सुंदर रूप या लेहेंग्याला चारचाँद लावत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Arrested in Nashik : शिर्डी ते नाशिकपर्यंत पसरलंय खरातच्या पापाचं जाळं; आता SIT लावणार छडा, महाराष्ट्रात कुठे कुठे गुन्हे दाखल?

Pune Rain : हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा; गुढी पाडव्यालाच पुण्यात पावसाची हजेरी

Latest Marathi News Live Update : कॅप्टन खरात प्रकरणात विशेष पथकाची चौकशी सुरू

थक्क करणार क्लायमॅक्स, हमजाची धडाकेबाज एन्ट्री आणि कराचीत माजवलेला कहर, कसा आहे dhurandhar 2 ?

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा ‘गेमचेंजर’ निर्णय! ‘तारीख पे तारीख’चा खेळ थांबवला! काय आहे नवा फॉर्म्युला?

SCROLL FOR NEXT