लाइफस्टाइल

यंदाची सुट्टी बीचवर; मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेले काही समुद्रकिनारे

शर्वरी जोशी

मे महिन्याची सुट्टी लागली की सगळ्यांचे पिकनिकचे प्लॅन रंगू लागतात.एकतर उन्हामुळे जीव कासावीस झाला असतो. त्यामुळे पर्यटक कायम थंड हवेचं ठिकाण किंवा एखादा बीच वगैरे याठिकाणीच सुट्टीचे प्लॅन करतात. त्यात अनेकदा फिरायला जायचं म्हटलं की पर्यटक मुंबईपासून कोसोदूर असलेल्या ठिकाणांचा विचार करतात. मग यात केरळ, मालदीव अशी दूरची आणि तितकीच खर्चिक ठिकाणं डोळ्यासमोर येतात. परंतु, वेळ आणि पैसा असं दोन्ही वाचवायचं असेल तर, मुंबईपासून लांब जाण्यापेक्षा इथेच जवळपास असलेल्या ठिकाणांचा विचार केला तर? मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर अशी काही ठिकाणं आहेत जेथे तुम्ही कमी पैशांमध्ये  पिकनिक फूल एन्जॉय करु शकता. विशेष म्हणजे कमी दरासोबतच इथे गेल्यावर तुम्हाला विदेशात फिरल्याचादेखील आनंद घेता येईल. त्यामुळेच मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेले बीच कोणते ते आज पाहुयात.

१. मार्वे बीच -

प्रचंड लोकप्रिय आणि कायम पर्यटकांची गर्दी असलेलं ठिकाण म्हणजे मार्वे बीच. मुंबईपासून हा बीच खूप जवळ आहे. त्यामुळे अगदी एका दिवसातदेखील तुम्ही जाऊन येऊ शकता. येथे बरीचशी हॉटेल्स, रिसॉर्ट आहेत त्यामुळे जर रहायचं असेल तर त्याचीही व्यवस्था इथे होऊ शकते.
अंतर - मार्वे बीच मुंबईपासून केवळ ३७ किलोमीटर अंतरावर आहे.

२. उट्टण बीच

मुंबईपासून केवळ दोन तासांमध्ये या बीचवर तुम्ही पोहोचू शकता. दिवसेंदिवस या बीचची लोकप्रियता वाढतांना दिसत आहे. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर आता हॉटेल, रिसॉर्ट्सदेखील सहज उपलब्ध होत आहेत. जर तुम्हाला धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ ब्रेक घ्यायचा असेल, तर ही जागा बेस्ट ऑप्शन आहे
अंतर - मुंबईपासून ५४ किलोमीटर

३. किहिम बीच -

अलिबागमधील किहिम बीचची तरुणाईमध्ये विशेष क्रेझ आहे. येथील स्वच्छ समुद्रकिनारा आणि त्यावर सळसळत्या लाटा पाहण्याची मौज काही औरच आहे. अलिबागपासून हा बीच १० किलोमीटर अंतरावर आहे. विशेष म्हणजे या बीचपासून जवळच दोन किल्लेदेखील आहेत.
अंतर - मुंबईपासून १०८ किलोमीटर 

४. रेवदंडा बीच -

अलिबागपासून आणखी जवळ असलेला एक बीच म्हणजे रेवदंडा बीच. जर तुम्ही खवैय्ये असाल आणि तुम्हाला माशांचे विविध प्रकार आवडत असतील तर या बीचला नक्की भेट द्या. कारण, येथे अनेक हॉटेल्समध्ये उत्तम प्रकारचे माशांचे प्रकार मिळतात. तसंच येथे समुद्रकिनारी रात्री शेकोटी करता येते, बार्बिक्यू पार्टी करता येते आणि तसंच काही वॉटर अॅक्टिव्हिजदेखील येथे करता येतात.
अंतर - मुंबईपासून १२५ किलोमीटर

५. कोर्लाई फोर्ट -

रायगड जिल्ह्यात हे ठिकाण असून पर्यटकांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. येथे तुम्ही ट्रेकिंगचा अनुभव घेऊ शकता. सोबतच जवळ काही बीच आहेत. त्यामुळे तेथेही तुम्ही जाऊ शकता. तरुणाईसाठी हा उत्तम स्पॉट आहे.
अंतर - मुंबईपासून १२७ किलोमीटर.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : जेवणात झुरळ, पिन! COEP च्या मुलींच्या वसतिगृहात मनविसेचे तीव्र आंदोलन; विद्यापीठाला ७२ तासांचे अल्टिमेटम

Latest Marathi News Live Update: FIR न कळणारी लोकं पार्थ पवारांवर आरोप करताय - फडणवीस

Railway Ticket Booking : रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंग सिस्टीममध्ये केला मोठा बदल!

Eknath Shinde : राळेगणसिद्धीत अण्णा हजारे व उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत बांबू लागवड अभियानाचा शुभारंभ!

Ashish Shelar : ‘वंदे मातरम्’ हे विकसित भारताच्या दिशादर्शनाचे गीत’ आशिष शेलार; ‘ध्यास वंदे मातरम्‌चा’ पुस्तकाचे प्रकाशन

SCROLL FOR NEXT