Workout 
लाइफस्टाइल

कोरोनामुक्त झाल्यानंतर वर्कआऊट कधी सुरु करावा?

अशक्तपणामध्ये वर्कआऊट केला तर सहाजिकच त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो

शर्वरी जोशी

दीड वर्षांपूर्वी देशात शिरकाव करणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. अनेकांनी या आजारावर यशस्वीरित्या मात केली आहे. मात्र, कोरोना बरा झाल्यानंतरही अनेकांमध्ये पोस्ट कोविडची post covid हेत. यात खासकरुन शारीरिक थकवा, अशक्तपणा, अंगदुखी या समस्या हमखास दिसून येत आहेत. मात्र, तरीदेखील काही फिटनेसप्रेमी या समस्या जाणवत असताना सुद्धा वर्कआऊट workout करत आहेत. मात्र, कोरोनामुळे आलेल्या अशक्तपणामध्ये वर्कआऊट केला तर सहाजिकच त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होईल. म्हणूनच, कोरोनावर मात केल्यानंतर वर्कआऊट नेमकं कधी सुरु करावं ते जाणून घेऊयात. (after-recovering-from-covid-19-when-can-working-out-be-started-here-is-answer)

१. हलके व्यायाम प्रकार -

कोविडमधून बरे झाल्यानंतर जर तुम्हाला वर्कआऊट करायची इच्छा असेल तर तुम्ही हलके आणि बैठे व्यायाम प्रकार करु शकता. यामध्ये तुम्ही योग, प्राणायाम करु शकता. मात्र, चुकूनही हेवी वर्कआऊट करु नका. त्यामुळे तुमच्या शरीराला त्रास होऊ शकतो. प्राणायाम किंवा दीर्घश्वास घेतला तर शरीरातील ऑक्सिजन लेव्हल स्थिर होण्यास मदत मिळेल असं गाजियाबादच्या फिजिशिअन डॉक्टर इजेन भट्टाचार्य यांनी सांगितलं.

२. वर्कआऊट रुटीन -

कधीही घरीच वर्कआऊट सुरु करत असाल तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसंच हलके व्यायाम करण्यासाठी दिवसातील १ वेळ निश्चित करा आणि शरीरावर ताण येणार नाही असेच व्यायाम प्रकार करा. तसंच कोविडवर मात केल्यानंतर साधारणपणे ३० दिवसांनंतर तुम्ही पुश-अप्स करु शकता.

३. लक्षणविरहित रुग्णांसाठी व्यायाम -

जर कोविड रुग्णामध्ये कोणत्याही प्रकारची लक्षण नसतील तर त्यांनी १५-२० दिवसांनंतर वर्कआऊट केला तरी चालेल. मात्र, सुरुवातीलाच हेवी वर्कआऊटची करु नये. प्रथम लहान लहान, सोपे व्यायाम प्रकार करावेत, असं गुरुग्राममधील पारस रुग्णालयाच्या डॉक्टर मीनाक्षी शर्मा यांनी सांगितलं.

४. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी -

कोरोनावर मात केल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहार आणि व्यायाम प्रकारावर भर दिला पाहिजे. यासाठी पौष्टिक आहारासोबतच दररोज वाफ घेणे, दीर्घश्वास घेणे, अनुलोम-विलोम असे प्राणायामाचे प्रकार करु शकता.

५. हायड्रेट ठेवा -

कोरोनातून बरे झाल्यानंतर आपल्या शरीराला हायड्रेट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी दररोज ८ ते १० ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : हांडेवाडीमध्ये टायर साठ्याच्या शेडला भीषण आग

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

Sangli Girl : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर दमदाटीने दोघांचे शारिरीक संबंध, आणखी दोघांनी त्याच मुलीवर केला विनयभंग; पोलिस म्हणतात...

SCROLL FOR NEXT