Hair Care Tips  esakal
लाइफस्टाइल

Hair Care Tips : केस धुतल्यानंतर केसांची काळजी कशी घ्यावी ? जाणून घ्या ‘या’ टिप्स

केस धुतल्यानंतर केसांची नीट काळजी घेणे हे अतिशय महत्वाचे आहे.

सकाळ डिजिटल टीम

केसांची निगा राखण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. केसांना तेलाने मालिश करतो, हेअर पॅक किंवा हेअर मास्कचा वापर करतो, उत्तम प्रकारचे शॅंम्पू-कंडिशनर वापरतो. हे सर्व करूनही केस गळणे, केस पातळ होणे, इत्यादी अनेक समस्या जाणवतात.

यामागे खरं तर अनेक कारणे असू शकतात. केस धुतल्यानंतर केसांची योग्य प्रकारे काळजी न करणे हे एक कारण प्रामुख्याने असू शकतं. केस धुतल्यानंतर केसांची नीट काळजी घेणे हे अतिशय महत्वाचे आहे. आज आपण केस धुतल्यानंतर केसांची काळजी कशी घ्यावी ? याबद्दल जाणून घेणार आहोत.

केस धुतल्यानंतर केसांची काळजी कशी घ्यावी ?

केस सुकवणे

शॅंम्पूने केस धुतल्यानंतर हे ओले केस चांगल्या प्रकारे सुकवणे हे अतिशय महत्वाचे आहे. आजकाल केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, हे नेहमी करणे टाळले पाहिजे. अगदीच घाई गडबड असेल तरच केस हेअर ड्रायरने सुकवावे.

इतर वेळी केस सुकवण्यासाठी टॉवेलचा वापर करावा. टॉवेलने केस चांगल्या प्रकारे कोरडे करून घ्यावे. त्यानंतर, ते थोडावेळ मोकळे सोडावेत. जेव्हा केस चांगल्या प्रकारे सुकतील तेव्हाच ते बांधावे. लक्षात ठेवा, ओले केस असतील तर ते लगेच बांधणे टाळा. अन्यथा ते जास्त प्रमाणात खराब होतील.

केस चांगले विंचरून घ्या

केस कोरडे केल्यानंतरच केस कंगव्याने विंचरणे योग्य ठरते. ओल्या केसांमध्ये कंगवा फिरवल्याने केस तुटण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे, केस कोरडे केल्यानंतर ते हळूहळू विंचरून घ्या.

केस विंचरण्यासाठी रूंद दातांचा कंगवा वापरा. या कंगव्याच्या मदतीने हळूवारपणे केस विंचरून घ्या. केस कोरडे झाल्यानंतर केस विंचरल्याशिवाय कोणतीही हेअरस्टाईल करू नका. जर असे केले तर, केसांमध्ये गुंता होण्याची शक्यता असते आणि केस गळण्याची भीती देखील असते.

केसांना हेअर सीरम लावा

केस धुतल्यानंतर केसांवर लगेच हेअर सीरम लावा. केस कोरडे केल्यानंतर आणि कंगव्याने विंचरून घेतल्यानंतर ही तुम्ही हेअर सीरम लावू शकता. हेअर सीरमचे ३-४ थेंब केसांमध्ये लावा. हेअर सीरम टाळूला चुकूनही लावू नका. टाळूला लावल्यास केस अधिक तेलकट होतील, त्यामुळे केसांच्या बटांनाच फक्त हेअर सीरम लावा.

हेअर सीरम लावल्याने केस मऊ होतात आणि चमकदार दिसतात. शिवाय, केसांमध्ये गुंता होत नाही आणि हेअर सीरम केसांमध्ये दिवसभर राहू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT