Akshaya Tritiya 2024 esakal
लाइफस्टाइल

Akshaya Tritiya 2024 : सोन्याचा झुमका, हिऱ्याची अंगठी अन् बरंच काही..! अक्षय तृतीयेला पत्नीला गिफ्ट करा 'हे' दागिने

Akshaya Tritiya 2024 : अवघ्या २ दिवसांवर अक्षय तृतीया येऊन ठेपली आहे. हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेला खास असे महत्व आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Akshaya Tritiya 2024 : अवघ्या २ दिवसांवर अक्षय तृतीया येऊन ठेपली आहे. हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेचे खास असे महत्व आहे. यंदा १० मे (शुक्रवारी) अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जाणार आहे. दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन घरात गृहप्रवेश, लग्न आणि मुंडन यांसह सर्व प्रकारची शुभ कार्ये केली जातात.

अक्षय तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी आवर्जून केली जाते. या दिवशी सोने-चांदी खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते. अनेक महिला या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी करण्यावर भर देतात.

अक्षय तृतीयेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील खास पूजा केली जाते. यंदाच्या अक्षय तृतीयेला जर तुम्हाला तुमच्या घरच्या लक्ष्मीसाठी अर्थात पत्नीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. कारण आज आम्ही तुम्हाला दागिन्यांच्या काही डिझाईन्स दाखवणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात दागिन्यांच्या या विविध ऑप्शन्सबद्दल.

झुमके

कानातील झुमके हा महिलांचा जीव की प्राण आहे. कारण, महिलांना कानात झुमके घालायला प्रचंड आवडतात. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने तुम्ही पत्नीला सोन्याचे झुमके गिफ्ट करू शकता. सोन्याच्या झुमक्यांमध्ये विविध प्रकारच्या डिझाईन्स तुम्हाला पहायला मिळतील. जर तुमच्या पत्नीला हेव्ही झुमके आवडत नसतील तर तुम्ही सोन्याचे कानातील टॉप्स ही गिफ्ट करू शकता. हा देखील उत्तम पर्याय आहे.

अंगठी

अंगठी हा दागिना महिलांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने तुम्ही पत्नीला अंगठी भेट देऊ शकता. तुम्ही पत्नीला जड अंगठी द्यावी, असे काही नाही. तुम्ही तुमच्या बजेटनुसार सोन्याची, चांदीची किंवा डायमंडची अंगठी भेट देऊ शकता. आजकाल अंगठ्यांमध्ये हेव्ही आणि लाईटवेट असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.

गळ्यातला सेट

लग्न असो किंवा कोणताही सण, समारंभ असो, महिलांना गळ्यातील सेट परिधान करायला आवडतो. जर तुमच्या पत्नीला सोन्याची ज्वेलरी आवडत असेल तर तुम्ही तिला सोन्याचा नेकलेस गिफ्ट करू शकता. परंतु, आजकाल महिलांमध्ये चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची क्रेझ आहे. तुम्ही तुमच्या बजेटनुसार पत्नीसाठी हेव्ही किंवा लाईटवेटमध्ये हिऱ्याचा, कुंदनचा किंवा चांदीचा नेकलेस खरेदी करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा अन् अण्‍णासाहेब डांगे यांचा प्रवेश; नेमका काय योगायोग?

Sikkim Nomad Village: ‘डिजिटल नोमॅड व्हिलेज’ची सुरूवात सिक्कीममध्ये; याकतेन गावातून ग्रामीण पर्यटनाला नवा प्रवास

स्वच्छतेबाबतीतली समाजातली अनास्था दाखवणाऱ्या 'अवकारीका' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; पथनाट्याने रंगला सोहळा

Menstrual Pain Relief: मासिक पाळीत वारंवार त्रास होतोय? तूप-पाणी आणि 'ही' 4 योगासने देतील नैसर्गिक आराम

'संत्या या गोष्टी सोडून दे' विकी कौशलने दिला संतोष जुवेकरला सल्ला! ट्रोलिंगवर म्हणाला, "संत्या तू आमच्यापेक्षा...."

SCROLL FOR NEXT