Akshaya Tritiya 2024 Sakal
लाइफस्टाइल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला 'या' 5 गोष्टी ठेवा तिजोरीत, भासणार नाही आर्थिक चणचण

Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय तृतीया 10 मे 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी काही खास गोष्टी तिजोरीत ठेवल्यास पैशाची चणचण भासणार नाही.

Puja Bonkile

Akshaya Tritiya 2024: हिंदू धर्मात अक्षय तृतीयाला खुप महत्व आहे. यंदा १० मे रोजी अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे. या दिवशी सोनं खरेदी करणे शुभ मानले जाते. याशिवाय शास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या अक्षय तृतीयेच्या दिवशी तिजोरीत ठेवल्यास आर्थिक चणचण भासणार नाही.

अक्षय तृतीयेला तिजोरीत पुढील गोष्टी ठेऊ शकता

चांदीचे नाणे

अक्षय तृतीयेला चांदीचे नाणे खरेदी करा आणि माता लक्ष्मीला अर्पण करावे. यानंतर चांदीचे नाणे लाल कपड्यात बांधून तिजोरी किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा. वर्षभर पैशाची कमतरता भासत नाही, असे मानले जाते. तिजोरी नेहमी भरलेली असते.

शंखपुष्पीचे मूळ

ज्या ठिकाणी शंखपुष्पी वनस्पती आहे तिथे नेहमीच आशीर्वाद असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी शंखपुष्पीच्या मुळास गंगाजलाने धुवावे. नंतर त्यावर कुंकू टिळा लावून चांदीच्या पेटीत ठेवावे. ही पेटी पैशाच्या जागी ठेवावी. असे म्हणतात की हा उपाय गरीबांनाही श्रीमंत बनवतो.

कुबेर यंत्र

अक्षय तृतीयेच्या दिवशी तिजोरीत विधीनुसार कुबेर यंत्र ठेऊ शकता. यामुळे घरात सुख-समृद्धी आणि सौभाग्य लाभते. पोर्णिमा, धनत्रोदशी, दिवाळी याप्रमाणे वेळोवेळी त्याची पुजा करावी. यामुले पैशीची चणचण भासणार नाही.

नारळ

नारळ हे फळ माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की दुकानातील तिजोरी आणि कपाटात फळ ठेवल्याने कधीही पैशाची कमतरता जाणवणार नाही. यामुळे वास्तू दोषही दूर होतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी लाल कपड्यात नारळ बांधून तिजोरीत ठेवावे.

कौडी

हळद हे भगवान विष्णू आणि गुरु ग्रहाचे प्रतीक मानले जाते. कौडी हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे. अशावेळी धनप्राप्तीसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी पिवळ्या कपड्यात कौडी बांधून तिजोरीत ठेवावी. गरिबी दूर होईल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT