Akshaya Tritiya 2024:  Sakal
लाइफस्टाइल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला गृहप्रवेश करताना कोणती काळजी घ्यावी, जाणून घ्या

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला गृहप्रवेश करताना उजवा पाय आधी ठेवावा.

Puja Bonkile

अक्षय तृतीया वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरी केली जाते. या दिवशी सोनं खरेदी करणे शुभ मानले जाते. अक्षय तृतीया हा दिवस कोणत्याही नवीन आणि शुभ कार्यासाठी खुप शुभ मानला जातो.

यंदा अक्षय तृतीया उद्या म्हणजेच १० मे रोजी साजरी होणार आहे. अक्षय तृतीया हा शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी सूर्य आणि चंद्र दोन्ही त्यांच्या उच्च राशीमध्ये स्थित आहेत. त्यामुळे या दिवशी लग्न, व्यवसाय सुरू करणे आणि घर वाढवणे यासारखी शुभ कार्ये अत्यंत शुभ मानली जातात.

अक्षय तृतीयेला गृह प्रवेशाचा शुभ मुहूर्त

अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या कोणत्याही कार्यात कोणत्याही प्रकारचा क्षय होण्याची शक्यता नसते. वैशाख महिन्यातील ही तिथी स्वयंसिद्ध मुहूर्तांपैकी एक मानली जाते. म्हणजे या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नाही.

अक्षय तृतीयेच्या दिवशी लोक नवीन वाहन खरेदी करणे, नव्या घरात प्रवेश करणे किंवा दागिने खरेदी करणे यासारख्या गोष्टी करतात. असे मानले जाते की हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले भाग्य आणि यश घेऊन येतो. या दिवशी घरात प्रवेश केल्याने घरात सदैव सुख-समृद्धी राहते. नवीन घरात आल्यानंतर लोकांना अडचणींचा सामना करावा लागत नाही.

अक्षय तृतीयेच्या दिवशी मुहूर्त न पाहता कोणतेही शुभ कार्य करता येते. या दिवशी तुम्ही कधीही घरात प्रवेश करू शकता.

मात्र, या दिवशी विशेष शुभ मुहूर्त पाहून घरात प्रवेश करायचा असेल, तर या दिवशीचा शुभ मुहूर्त ६ तास ४४ मिनिटे आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी 05:33 ते दुपारी 12:18 पर्यंतचा काळ गृहप्रवेशासाठी अतिशय शुभ मानला जात आहे.

गृहप्रवेश करताना कोणती काळजी घ्यावी

गृहप्रवेशाच्या वेळी देवी-देवतांच्या मूर्ती किंवा फोटो घराच्या पूर्व दिशेला ठेवाव्यात.

पूजा करण्यापूर्वी घर स्वच्छ करावे.

पाण्यात मीठ मिक्स करून नवीन घरातील फरशी पुसावी. यामुळे नकारात्मक शक्ती दूर राहते.

घरात प्रवेश करताना उजवा पाय आधी ठेवावा.

घराचे मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावावे.

हवनासाठी वनौषधींची व्यवस्था करावी.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT