Akshaya Tritiya Rangoli Design: Sakal
लाइफस्टाइल

Akshaya Tritiya Rangoli Design: अक्षय तृतीयेला काढा कुबेर यंत्राच्या सुंदर रांगोळ्या, वाढेल अंगणाची शोभा

Akshaya Tritiya Rangoli Design: अक्षय तृतीयाला कुबेर यंत्राच्या सुंदर रांगोळी काढून हा दिवस खास बनवू शकता.

Puja Bonkile

Akshaya Tritiya Rangoli Design: यंदा अक्षय तृतीया १० मे रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करणे शुभ मानले जाते. तसेच कोणतेही शुभ कार्य करणे शुभ मानले जाते.

हिंदू धर्मानुसार एखाद्या शुभ प्रसंगी घरासोमोरच्या अंगणात आणि देवघरासमोर रांगोळी काढणे हे शुभ प्रतीक मानले जाते. तुम्ही अक्षय तृतीयेला कुबेर यंत्राची सुंदर रांगोळी काढून हा दिवस खास बनवू शकता. कुबेर यंत्र हे धनाच्या देवतेचे प्रतीक मानले जाते.

कुबेर यंत्राची रांगोळी

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही मंदिरासमोर कुबेर यंत्राची रांगोली काढू शकता.

यासाठी सर्वात आधी स्केलचा वापर करून एक तिरकस रेषा काढून बॉक्स बनवा.

नंतर फेविकॉलच्या बाटलीच्या साहाय्याने रेषांवर पांढऱ्या रंगाने रेषा काढा.

रेषा बनवल्यानंतर, रिकामी जागा पिवळ्या आणि केशरी रंगांनी भरा.

लक्ष्मी कुबेर यंत्र रांगोळीची रचना आकर्षक बनवण्यासाठी यंत्राच्या दोन्ही बाजूला दोन रेषा काढा आणि मध्यभागी दोन ठिपके टाकून पूर्ण करा.

ताटात कुबेर यंत्र बनवा

ताटात कुबेर यंत्रही बनवू शकता.

यासाठी सर्वात आधी एक स्वच्छ ताट घ्यावे.

नंतर फेविकॉलच्या बाटलीच्या मदतीने त्यावर एक ठिपका लावून बॉक्स बनवा.

नंतर त्रिकोणी बिंदूसह सर्व ठिपके जोडणाऱ्या रेषा बनवा.

यानंतर, मधला भाग लाल रंगाने भरून आणि बाजूची रिकामी जागा पिवळ्या रंगाने भरून पूर्ण करा.

रांगोळीला फिनिशिंग टच देण्यासाठी ताटातील रिकामी जागा इतर रंगाने भरू शकता.

चौकोर रांगोळी डिझाइन

अक्षय तृतीयेच्या निमित्ताने घराच्या अंगणात किंवा मंदिरासमोर फुलांची आणि पानांची रांगोळी काढू शकता .

सर्वात पहिले खडूच्या साहाय्याने चौकोनी बॉक्स तयार करून त्याचे चार भाग करावेत.

नंतर हे बॉक्स चार वेगवेगळ्या रंगांनी भरा.

फेविकॉलच्या बाटलीच्या साहाय्याने बॉक्समध्ये भरलेल्या रंगावर पांढऱ्या रंगाचे छोटे ठिपके करून प्रत्येकी एक फूल तयार करा.

यानंतर, प्रत्येक बॉक्सच्या काठावर चार ठिपके बनवा आणि त्यांना चमच्याने फुलं तयार करण्यासाठी आत पसरवा.

फ्लॉवर बनवल्यानंतर त्याच्या काठावर हिरवा रंग देऊन एक पान तयार करून रांगोळी पूर्ण करा.

फुलांच्या पानांची डिझाइन

अक्षय तृतीयेनिमित्त तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात फुलांची रांगोळी काढू शकता.

यासाठी सर्वात पहिले फेविकॉलच्या बाटलीच्या मदतीने ठिपके तयार करा.

ठिपका बनवल्यानंतर चमच्याने आतल्या बाजूने पसरून एक फूल बनवा.

आता बाहेरील बाजूस छोटे ठिपके करून काठीच्या साहाय्याने पानाचा आकार द्या.

रांगोळी आकर्षक बनवण्यासाठी पानाच्या बाजूला असलेली रिकामी जागा तीन ठिपक्यांच्या साहाय्याने फुल करून पूर्ण करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! 11 सप्टेंबरला पुन्हा दर कोसळणार? जाणून घ्या ताजी अपडेट

‘त्याला माझी इनसिक्युरिटी वाटायची’; अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी उघड केलं गुपित, म्हणाल्या...'माझ्यापेक्षा जास्त...'

ChatGPT's 80s Photo Trend: Instagram वर व्हायरल होतोय 'ChatGPT ’80s Photo Trend'; 'हा' सोपा प्रॉम्प्ट वापरून तयार करा तुमचा ८० च्या दशकातील रेट्रो लूक!

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Share Market Today: इराणच्या अमेरिकेला धमकीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

SCROLL FOR NEXT