Vastu Tips Sakal
लाइफस्टाइल

Vastu Tips: वास्तुनुसार अक्षय तृतीयेला करा 'हे' काम, घरात राहील कायम ऐश्वर्य

असे मानले जाते की यादिवशी सोने खरेदी केल्याने घरात आर्थिकदृष्ट्या समृद्ध राहते आणि विशेषत: माता लक्ष्मी आणि कुबेर यांचा आशीर्वाद मिळतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी वास्तुशास्त्रात काही नियम सांगितलेले आहे.

पुजा बोनकिले

हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला खूप महत्त्व आहे. यंदा अक्षय्य तृतीया 10 मे म्हणजेच शुक्रवारी साजरी होणार आहे. असे मानले जाते की यादिवशी सोने खरेदी केल्याने घरात आर्थिकदृष्ट्या समृद्ध राहते आणि विशेषत: माता लक्ष्मी आणि कुबेर यांचा आशीर्वाद मिळतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी वास्तुशास्त्रात काही नियम सांगितलेले आहे. त्यांचे पालन केल्यास घरात कायम ऐश्वर्य राहील.

या दिशेला ठेवावे पैसे

अक्षय तृतीयेच्या दिवशी पैसे तुमच्या घराच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावे. असे मानले जाते की असे केल्याने तुमच्या घरात समृद्धी येते आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्यांपासून दूर राहते.

या गोष्टींचे करा दान

वास्तुनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करणे गरजेचे असते. घरामध्ये एक भांडे पाण्याने भरून त्यात काळे तीळ, चंदन आणि पांढरी फुले टाकून पितरांना अर्पण करावे. असे केल्याने तुम्ही पितृदोषापासून मुक्त राहाल, या दिवशी काही गरीब लोकांना अन्नदान देखील करावे. असे केल्याने तुमच्या जीवनात कायम सुख-समृद्धी राहील.

श्री यंत्र लावावे

वास्तुशास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी घरामध्ये श्री यंत्र आणल्यास आर्थिक समस्या दूर राहतात.

या गोष्टींची घ्या काळजी

अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते. त्यामुळे या पवित्र दिवशी घराची संपूर्ण स्वच्छता राखली पाहिजे. घरात जाळे नसावे, खरखटी भांडी नसावीत. वास्तूनुसार, अशा गोष्टी घरात पैसा येण्याचा मार्ग रोखतात, त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी संपूर्ण स्वच्छता राखावी.

या दिशेला ठेवा आरसा

अक्षय तृतीयेच्या दिवशी उत्तर दिशेला आरसा लावणे शुभ मानले जाते. या दिशेला आरसा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते. ज्यामुळे आयुर्मान आणि संपत्ती वाढते. वास्तूनुसार उत्तर दिशेला आरसा लावल्याने घरातील लोक उत्साही आणि कामात व्यस्त राहतात.

मुख्यदारावर दिवा लावावा

अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला दिवे लावा आणि दक्षिण दिशेला एक दिवा लावावा. असे केल्याने घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते आणि पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि या दिशेपासून पितरांचा घरात प्रवेश होतो. या दिशेला दिवा ठेवल्याने अनेक दु:ख दूर होतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रग्ज प्रकरणी सर्वात मोठी कारवाई, १२ हजार कोटींचा माल जप्त; २०० ग्रॅमचा तपास करताना ३२ हजार लीटरपर्यंत पोहोचले पोलीस

Team India: ऋतुराज गायकवाडवर पुन्हा 'अन्याय'! १८४ धावांची खेळी करूनही भारताच्या संघात मिळाले नाही स्थान

India Tallest Ganesha Idol Immersion: भारतातील सर्वात उंच गणपती मूर्तीचे विसर्जन, भक्ती, उत्साह आणि भावनिक निरोपाचा क्षण, पाहा व्हिडिओ

Latest Maharashtra News Updates : उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली पूरग्रस्त भागांना भेट

Ganpati Visarjan 2025 Live Updates : कारंजात लाडक्या बाप्पाला पारंपारिक पद्धतीने निरोप

SCROLL FOR NEXT