Alia Bhatt Pantsuit Dress Sakal
लाइफस्टाइल

Alia Bhatt Pantsuit Dress : पँटसूट ड्रेसमध्ये आलिया भट्टचा ग्लॅमरस लूक, जाणून घ्या सब्यसाचीने डिझाईन केलेल्या ड्रेसचं वैशिष्ट्य

Alia Bhatt New Look: आलिया भट्टने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे, ज्यात तिने ऑफ व्हाइट रंगाचा फेमस डिझानर सब्यसाचीने डिझाइन केला आहे.

Puja Bonkile

Alia Bhatt Pantsuit Dress : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या अभिनयासह फॅशन सेन्ससाठी देखील ओळखली जाते. आलियाचा टॅडिशनल, इंडोवेस्टर्न आणि वेस्टर्न ड्रेसिंग सेन्स खुप अप्रतिम आहे.

आलिया तिच्या प्रत्येक स्टाईलने चाहत्यांची मने जिंकते. अलिकडेच आलियाने सोशल मिडियावर काही फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये तिने ऑफ व्हाइट रंगाचा ड्रेस घातला आहे. या पँटसुट ड्रेसमध्ये ती खुपच सुंदर दिसत आहे. हा ड्रेस प्रसिद्ध सब्यसाचीने डिझाइन केला आहे. या ड्रेसचे खास वैशिष्ट्य काय आहे हे जाणून घेऊया.

ड्रेसचे खास वैशिष्ट्य

प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची यांच्या संग्रहातून घेतलेल्या या ऑफ-व्हाइट डीप व्ही-नेक ब्रालेट ड्रेसमध्ये गुलाबी फुलांचे प्रिंट आहेत. आलियाने मॅचिंग पँटसह या ड्रेसचा लूक पुर्ण केला आहे. सब्यसाची बेल्ट लावलेला आहे. ग्लॅमरस वाढवण्यासाठी मॅचिंग फुल स्लीव जॅकेट घातले आहे. या जॅकेटला सुशोभित बॉर्डरने सजवले आहे.

आलियाच्या या लुकसाठी सेलिब्रिटी फॅशन स्टायलिस्ट प्रियांका कपाडिया बदानी स्टायलिस्ट होती. आलियाने हा लूक गोल्डन चेन नेकलेससह स्टाइल केला. ज्यामध्ये एक अनोखा पेंडेंट होता. यासोबतच आलियाने लूकशी जुळणाऱ्या ड्रेससोबत पांढऱ्या रंगाची हील्सही घातली आहे.

मेकअप

प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट सावलीन कौर मनचंदा यांनी आलियाचा मेकअप केला होता. या लूकसह आलियाला एक न्यूड लूक दिला, ज्यामध्ये तिने न्यूड आयशॅडो, मस्करा-कोटेड लॅशेस, ब्लश केलेले गाल, ल्युमिनस हायलाइटर आणि न्यूड लिपस्टिक वापरली.

Alia Bhatt

आलियाची हेअरस्टाइल

प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट अमित ठाकूर यांनी आलियाची हेअरस्टाईल केली होती. आलियाने या लूकसाठी खांद्यापर्यंतचे केस ठेवले आणि मेसी स्टाईल केली होती. आलियाने साइड पार्टीशनमध्ये तिचे केस मोकळे सोडले होते, ज्यामुळे एक ब्लो-ड्राय लुक तयार झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT