Alia Bhatt Hairstyles esakal
लाइफस्टाइल

Alia Bhatt Hairstyles : लग्नसमारंभात परफेक्ट लूक हवाय? मग, आलिया भट्टच्या 'या' हटके हेअरस्टाईल्सपासून घ्या प्रेरणा

Alia Bhatt Hairstyles : अभिनेत्री आलिया भट्ट मागील काही काळापासून तिच्या अभिनयासोबतच, फॅशनसेन्समुळे आणि हेअरस्टाईलमुळे जास्त चर्चेत आली आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Alia Bhatt Hairstyles : अनेक महिला आजकाल साडी, लेहेंग्यात किंवा ड्रेसमधील परफेक्ट लूकसाठी बॉलिवूड अभिनेत्रींचे हटके लूक्स रिक्रिएट करताना दिसतात. हे लूक्स रिक्रिएट करताना केवळ त्यांच्या आऊटफीट्सपासून प्रेरणा न घेता तुम्ही त्यांच्या मेकअप आणि हेअरस्टाईलपासून ही मदत घेऊ शकता.

अभिनेत्री आलिया भट्ट मागील काही काळापासून तिच्या अभिनयासोबतच, फॅशनसेन्समुळे आणि हेअरस्टाईलमुळे जास्त चर्चेत आली आहे. तिचे फॅशन लूक्स आणि हेअरस्टाईल्स महिलांना प्रचंड आवडतात. त्यामुळे, आज आपण खास आलिया भट्टच्या वाढदिवसानिमित्त तिच्या काही सुंदर हेअरस्टाईल्सबद्दल जाणून घेणार आहोत.

बीची वेब हेअरस्टाईल

अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या फॅशनसोबतच हेअरस्टाईलवर ही विविध प्रयोग करताना दिसते. जर तुम्हाला मोकळे केस ठेवायला आवडत असतील, तर तुम्ही आलियाप्रमाणे ही बीची वेब हेअरस्टाईल करू शकता.

खास करून वेस्टर्न आऊटफिट्सवर ही हेअरस्टाईल उठून दिसते. या हेअरस्टाईलमध्ये केसांना केवळ हलक्या पद्धतीने कर्ल करायचे आहे.

वेवी हेअरस्टाईल

आलिया भट्टची ही आवडती हेअरस्टाईल आहे, असे म्हणायला काही हरकत नाही. कारण, अनेकदा आलियाला या हेअरस्टाईलमध्ये पाहण्यात आले आहे. आलियाने तिच्या लग्नात केसांची ही वेवी हेअरस्टाईल केली होती.

जर तुमचे केस पातळ असतील, तर तुम्ही ही हेअरस्टाईल ट्राय करू शकता. पारंपारिक लेहेंगा, ड्रेस किंवा साडीवर ही हेअरस्टाईल अगदी शोभून दिसेल. ही हेअरस्टाईल करण्यासाठी केसांना हलका वॉल्यूम जोडायचा आहे. लग्न किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी ही वेवी हेअरस्टाईल एकदम बेस्ट आहे.

ट्विस्टेड ब्रेड हेअरस्टाईल

जर तुम्हाला साडीवर किंवा एखाद्या वेस्टर्न आऊटफीटवर मोकळे केस सोडायचे नसतील तर तुम्ही ही ट्विस्टेड ब्रेड हेअरस्टाईल करू शकता. आलियाने तिच्या पिवळ्या रंगाच्या साडीवर ही ट्विस्टेड ब्रेड हेअरस्टाईल केली होती. ज्यामुळे, तिच्या लूकला एक वेगळाच टच मिळाला होता.

ही हेअरस्टाईल करायला जरी अवघड असली तरी ती केल्यावर तुमचा लूकला चारचाँद लागतील यात काही शंका नाही. कोणत्याही साडीवर किंवा ड्रेसवर ही हेअरस्टाईल तुम्ही ट्राय करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT