Beauty tips esakal
लाइफस्टाइल

Beauty tips: काजळ लावल्यावर होते डोळ्यांची जळजळ? वापरा बदामाचं काजळ

केमिकलयुक्त काजळ वापरुन डोळे खराब करण्यापेक्षा घरच्याघरी बदामाचं काजळ तयार करण्याची सोपी पध्दत जाणून घ्या.

सकाळ डिजिटल टीम

केमिकलयुक्त काजळ वापरल्यानं डोळ्यांना खाज येणं, डोळे लाल होणं, नजर कमी होणं एवढ्या गंभीर समस्या निर्माण होवू शकतात. हे टाळण्यासाठी काजळ वापरु नये असं काहीवेळा सुचवलं जातं. पण त्यावरही आम्ही उपाय सांगत आहोत. बाहेरच्या केमिकलयुक्त काजळानं डोळ्यांचं सौंदर्य वाढत असलं तरी डोळ्यांचं आरोग्य मात्र धोक्यात येतं. डोळे सुरक्षित राखून डोळ्यांचं सौंदर्य वाढवण्यासाठी बदाम आणि साजूक तुपाचा वापर करुन घरच्याघरी काजळ तयार करता येतं.

डोळ्यात काजळामुळे पूर्ण लूकच बदलून जातो. काजळ घातल्यानं डोळ्यांचं सौंदर्य वाढतं. लहान मुलांसाठी बऱ्याचदा घरी काजळ केलं जातं. केमिकलचे साइड इफेक्ट टाळण्यासाठी घरच्या घरी अनेक ब्यूटी प्रोडक्टस तयार करता येतात. तसंच काजळ सहज घरी करता येतं. सौंदर्य आणि डोळ्यांचं आरोग्य या दुहेरी फायद्यासाठी बदाम आणि साजूक तुपापासून डोळ्यांसाठी फायदेशीर असं तयार करता येतं.

बदामाचं काजळाचे फायदे

१. बदामाचं काजळ डोळ्यांसाठी सुरक्षित असतं. बदामात अ आणि इ जीवनसत्व असतं. बदामाचं काजळ नियमित वापाल्यानं दृष्टी सुधारते.

२. बदामाचं काजळ डोळ्यात घातल्यानं डोळे शांत राहातात. डोळ्यांना थंडावा मिळतो. डोळ्यांना खाज येणं, डोळे जळजळणं या समस्या दूर होतात. बदामाच्या काजळानं डोळ्यांना आराम मिळतो.

३. बदामाचं काजळ डोळ्यात घातल्यानं डोळे सुंदर दिसतात. पापण्यांचे केस वाढतात. डोळ्यांना छान चमक येते. घरी तयार केलेलं बदामाचं काजळ वापरल्यानं कोणतेही साइड इफेक्ट होत नाही.

बदामापासून काजळ कसं करावं?

काटे चमच्याने बदाम पकडून तो दिव्यावर धरावा. बदाम दिव्यावर जाळताना वर चमचा उलटा धरावा. बदाम जळत जाईल तशी चमच्यावर काजळी जमा होते. ही काजळी एका छोट्या डब्बीत जमा करावी. बदाम जाळून झाल्यानंतर या काजळीत थोडंसं साजूक तूप घालून ते चांगलं एकत्र करावं. हे काजळ डोळ्यांचं सौंदर्य तर वाढतंच आणि डोळ्यांचं आरोग्यही चांगलं राहातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

SCROLL FOR NEXT