health news 
लाइफस्टाइल

बदाम की शेंगदाणे? कोणता ड्रायफ्रूट आरोग्यासाठी अधिक फायदेशीर; पाहा..

हे दोन्ही सुका मेवा आरोग्यासाठी फायद्याचे आणि पोषक आहेत.

सकाळ डिजिटल टीम

हे दोन्ही सुका मेवा आरोग्यासाठी फायद्याचे आणि पोषक आहेत.

लोक सकाळच्या नाश्त्यात ब्रेडसोबत पीनट बटर खातात. याशिवाय संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये अनेकांना शेंगदाणे खायला आवडतात. शेंगदाणे आणि गुळ हे शरीराच्या आरोग्यासाठी फायद्याचे असते. स्मरणशक्ती वाढण्यासाठी किंवा बुद्धी तल्लख होण्यासाठी बदाम खा!, असा सल्लाही अनेकजण देत असतात.

हे दोन्ही सुका मेवा आरोग्यासाठी फायद्याचे आणि पोषक आहेत. बदाम खाताना काहीजण ते भिजवून खातात. मात्र या दोन्ही ड्रायफ्रुट्समध्ये तुलनेत जास्त हेल्दी कोण असे विचारले तर काय उत्तर दिले जाईल हे आपण पाहणार आहोत. म्हणजेच दोन्हीपैकी कुणी एक बेस्ट आहे की दोन्हीही शरीरासाठी समान आवश्यक आहेत हे जाणून घेणार आहोत...

बदामाचे फायदे

  • वजन कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी बदाम खाल्ले जाते. बदाम खाल्ल्याने हृदयविकार, कर्करोग आणि साखर वाढीचा धोका कमी होतो. यामुळे स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. यात मॅग्नेशिअम फायबर, प्रथिने, व्हिटॅमिन, फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते.

  • भिजवलेले बदाम खाणे हे शरीरासाठी अधिक फायदेशीर असते. भिजवलेले बदाम पचायला सोपे जाते तसेच ते केस आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. रोज भिजवलेले २ बदाम खाणे शरीरासाठी फायद्याचे ठरु शकते.

  • बदाम खाणे हृदयासाठी फायद्याचे असते. यामुळे मधुमेहावरही नियंत्रण ठेवता येते असून हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. याशिवाय बदाम खाल्ल्याने त्वचा चमकदार आणि मुलायम होते.

शेंगदाणे खाण्याचे फायदे

  • शेंगदाणे खाल्ल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो आणि शरीराला काही सूज असेल तर ती आटोक्यात राहते. मात्र शेंगदाणे फक्त मूठभर खावे त्यापेक्षा अधिक खाऊ नये. यामुळे पोटात गॅसची समस्या उद्भवू शकते. शेंगदाण्यांमुळे रक्तातील साखरही नियंत्रणात राहते.

  • शेंगदाणे खाण्याचा योग्य मार्ग म्हणजे रात्री मूठभर भिजवून सकाळी खाल्ल्यास ते थोडे थंड होते. असे केल्याने शेंगदाणे चांगले पचते. या दोन्हींतील पोषक तत्व शरीरासाठी फायदेशीर आहेत, हे यावरून सिद्ध होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fire News: तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

Plane Service : मोठी बातमी! सोलापूर ते मुंबई विमानसेवा सप्टेंबरपासून होणार सुरू; 'डीजीसीए'कडून स्टार एअरला परवानगी

Rekha Gupta Announcement: 'जनसुनावणी'वेळी झालेल्या हल्ल्यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Ajinkya Rahane नंतर कोण होणार मुंबईचा कर्णधार? श्रेयससोबत शर्यतीत ३३ वर्षीय खेळाडू; MCA कडे आहेत 'हे' तीन पर्याय

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT