शारीरिक संबंध sakal file photo
लाइफस्टाइल

दिर्घकाळ शारीरिक संबंध न ठेवणे फायदेशीर का नुकसानदायक?

शारीरिक संबंध न ठेवण्याची अनेक कारणे असू शकतात.

सकाऴ वृत्तसेवा

शारीरिक संबंध न ठेवण्याची अनेक कारणे असू शकतात.

विवाहित जोडप्यांच्या आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा ते एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवू शकत नाहीत. शारीरिक संबंध न ठेवण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे की एकटेपणाची कमी, कौटुंबिक जबाबदारी, शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा नसणे, जोडीदारापासून दूर राहणे किंवा वयानंतर शारीरिक संबंध ठेवण्याची तुमची स्वतःची इच्छा न होणे.

साधारणपणे असे दिसून येते की, वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर जोडपे जास्त काळ शारीरिक संबंध ठेवत नाहीत. 20-22 वर्षांतील मुलांच्या समोरची खोली आपण बंद केली पाहिजे हे योग्य थोडी ना वाटते. दुसरीकडे, शारीरिक संबंध तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दीर्घकाळ शारीरिक संबंध न ठेवल्याने शरीरावर वेगवेगळे परिणाम होतात.

शारीरिक संबंधाच्या कमतरतेमुळे व्यक्तीच्या मानसिक आरोग्याचेही खूप नुकसान होते. आपण स्वत: ते ओळखत नसलो तरी आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला हे पुरुष/स्त्री आपल्या जोडीदारापासून बराच वेळ दूर असल्याची जाणीव होते.

- वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, शारीरिक संबंधच्या कमतरतेमुळे शरीरातील एंडॉर्फिन आणि ऑक्सिटोसिन हार्मोन्सची पातळी कमी होते. हे दोन्ही हार्मोन्स तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करतात.

- दीर्घकाळ शारीरिक संबंध न ठेवल्यास ती करण्याची इच्छा न होणे.

- नियमित शारीरिक संबंध न ठेवल्याने जोडीदारासोबतच्या नातेसंबंधावर गंभीर परिणाम होतो. तथापि, ते परस्पर समंजसपणावर अधिक अवलंबून असते.

या नुकसानीसोबतच त्याचे काही फायदेही आहेत...

- अकाली गर्भधारणेबद्दल काळजी करू नका.

- स्वतःला आणि तुमच्या शरीराला समजून घेण्यासाठी वेळ मिळतो.

हे असे फायदे आणि तोटे जे स्वतः सामान्य माणसाला जाणवू शकतात. पण असे काही परिणाम आहेत ज्यांची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांना भेटल्यानंतर मिळते.

शारीरिक संबंध न ठेवल्याने शरीरावर कोणते परिणाम होतात, त्याची माहिती आपल्याला वैद्यकीय तज्ज्ञांकडून मिळते. त्याचे कोणते चांगले आणि वाईट परिणाम आहेत हे आपण पाहूया.

कमकुवत प्रतिकारशक्ती (इम्युन सिस्टिम)

दीर्घकाळ शारीरिक संबंध न ठेवल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे, एखादी व्यक्ती लवकर आणि अधिक वेळा आजारी पडू लागते. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, जे लोक नियमित शारीरिक संबंध ठेवतात त्यांच्या स्लाइवामध्ये विविध संक्रमणांशी लढण्यासाठी जास्त अँटीबॉडी असतात.

जननेंद्रियाचे आरोग्य कमी होते.

शारीरिक संबंध नसल्यामुळे महिलांचे जननेंद्रियाचे आरोग्य कमी होते. रक्तप्रवाहात अडथळा येऊ शकतो. याव्यतिरिक्त, त्यांची उत्तेजना कमी होते.

हृदय अस्वस्थ राहते

शारीरिक संपर्काचा अभाव हृदयविकाराचा धोका वाढवू शकतो. शारीरिक संबंध हे शरीरासाठी व्यायामासारखे आहे, जे शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनची पातळी संतुलित करते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT