Anant Ambani Marriage sakal
लाइफस्टाइल

Anant Ambani Marriage Gift : अनंत राधिकाच्या लग्नासाठी अंबानींनी रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना दिली खास भेट, गिफ्ट बॉक्समध्ये काय आहे?

याशिवाय रिलायन्सचे कर्मचारीही हा खास सोहळा सेलिब्रेट करत आहेत. त्यांना कंपनीकडून एक गिफ्ट बॉक्स देण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

आज म्हणजेच 12 जुलै रोजी देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी त्याची बालपणीची मैत्रीण राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. लग्नानिमित्त येणाऱ्या पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था 5 स्‍टार हॉटेल्समध्ये करण्यात आली असून त्यांना लग्जरी गिफ्ट्स देण्यात येत आहेत. याशिवाय रिलायन्सचे कर्मचारीही हा खास सोहळा सेलिब्रेट करत आहेत. त्यांना कंपनीकडून एक गिफ्ट बॉक्स देण्यात आला आहे.

गिफ्ट बॉक्सचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

गिफ्ट बॉक्सचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रिलायन्सच्या अनेक कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या गिफ्ट बॉक्सचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लाल रंगाच्या गिफ्ट बॉक्सवर गोल्डन कलरमध्ये लिहिले आहे, 'देवी-देवतांच्या आशीर्वादाने आम्ही अनंत आणि राधिकाचा विवाह साजरा करत आहोत.'

गिफ्ट बॉक्समध्ये काय आहे?

अनंतच्या लग्नानिमित्त अंबानी कुटुंबाने दिलेल्या गिफ्ट बॉक्समध्ये हल्दीरामच्या नमकीनची चार पाकिटे, मिठाईचा बॉक्स आणि एक चांदीचे नाणे आहे. नमकीनमध्ये हल्दीरामची आलू भुजिया शेव आणि लाइट चिवडा आहे. यापूर्वी नीता आणि मुकेश अंबानी यांनी 50 जोडप्यांचा सामूहिक विवाहही आयोजित केला होता. अंबानी कुटुंबाच्या वतीने या जोडप्यांना त्यांच्या लग्नानिमित्त एक लाख रुपयांचा चेक, सोन्याचे आणि चांदीचे दागिने, रेशन आणि घरगुती साहित्य देण्यात आले.

15 जुलै रोजी रिसेप्शन होणार आहे

12 जुलैला म्हणजेच आज लग्न झाल्यानंतर 15 जुलैला रिसेप्शन आहे. पाहुण्यांना आमंत्रणासोबत चांदीचे मंदिर, पश्मिना शाल आणि बरेच काही मिळाले. अनंत आणि राधिका मर्चंटच्या लग्नाची उत्सुकता मार्चपासूनच सुरू झाली होती. सर्वप्रथम जामनगरमधील रिलायन्सच्या आलिशान इस्टेटमध्ये तीन दिवसांचा धमाकेदार कार्यक्रम झाला.

११ हजार लिटर दूधाने नदीचं पाणी खरंच शुद्ध होईल का? पर्यावरणावर कसा परिणाम होईल? वाचा...

Business Growth: अमेरिका-इराण शस्त्रसंधीचा 'या' भारतीय कंपन्यांना मोठा फायदा! निर्यात वाढली; कंपन्यांचे शेअर्स तेजीत

Nashik Crop Damage : हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावला! अवकाळीच्या तडाख्यात पावणेदोन लाख हेक्टरवरील पिके पाण्यात, पावणेतीन लाख शेतकऱ्यांना फटका

19 Minute Viral Video नंतर पाकिस्तानात मोठे स्कॅंडल समोर, प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा MMS सोशल मीडियावर व्हायरल

Varuthini Ekadashi 2026 : 10 हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ देणारे व्रत; जाणून घ्या तिथी, मुहूर्त अन् उपाय!

SCROLL FOR NEXT