Anand_Mahindra 
लाइफस्टाइल

..म्हणून आनंद महिंद्रांनी अक्सर पटेलच्या गॉगलमध्ये पोस्ट केला सेल्फी

सकाळवृत्तसेवा

महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. अनेकदा ते सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ किंवा फोटो शेअर करतात. यात बऱ्याचदा लोकांनी जुगाड केलेले काही व्हिडीओदेखील असतात. परंतु, यावेळी त्यांनी कोणताही व्हिडीओ शेअर केला नसून खुद्द स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते अनोख्या अंदाजात दिसत असल्यामुळे त्यांचा हा फोटो अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर त्यांचा एक सेल्फी शेअर केला आहे. विशेष म्हणजे एका खास कारणासाठी त्यांनी हा फोटो शेअर केल्याचं . या फोटोमध्ये आनंद महिंद्रा यांनी गॉगल लावला असून एका व्यक्तीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी हा भन्नाट फोटो शेअर केला आहे. 

अहमदाबाद येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाने इंग्लंडचा पराभव केला होता. त्यामुळे भारतीय संघाचं अभिनंदन आणि कौतुक करण्यासाठी त्यांनी अक्सर पटेलचा गॉगल घातलेला फोटो शेअर केला होता. तसंच भारत विजयी झाल्यानंतर मी अक्सर पटेलसारखाच गॉगल मागवेन, असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानुसार, महेंद्रा यांनी हा गॉगल मागवला असून तो लावून फोटो शेअर केला आहे.

"मी माझा दिलेला शब्द पाळला आहे. त्यानुसार Axar पटेलसारखा गॉगल लावून मी माझं वचन पूर्ण केलं आहे", असं कॅप्शन महेंद्रा यांनी या फोटोला दिलं आहे.

दरम्यान,  सध्या सोशल मीडियावर आनंद महिंद्रा यांचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये भारताने ३-१ असा मालिका विजय मिळवल्यावर आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत त्यांना फिरकीपटू अक्ष पटेलला गॉगल आवडल्याचं म्हटलं होतं.तसंच तो गॉगल घेण्याची इच्छाही व्यक्त केली होती.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

Ladki Bahin Yojana August 2026 Installment GR : लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याचा GR आला; खात्यात 1,500 जमा होणार की 3,000 शासन निर्णयात नेमकं काय?

Vinod Kambli ने ठाण्याच्या हॉस्पिटलमधून पोस्ट केला Video; प्रकृतीबाबत सांगायचं सोडून, काय बोलतोय ऐका; नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

SCROLL FOR NEXT