Anant Radhika Wedding Reception : esakal
लाइफस्टाइल

Anant Radhika Wedding Reception : ग्रॅंड रिसेप्शनमध्ये अंबानींच्या सुनेचा रॉयल अंदाज, एलिगंट लूकमध्ये राधिका शोभतेय अप्सरा.!

Anant Radhika Wedding Reception : अनंतने राधिका मर्चंटसोबत १२ जुलैला लग्नगाठ बांधली. या जोडप्याचे लग्न अतिशय दिमाखदार पद्धतीने पार पडले.

Monika Lonkar –Kumbhar

Anant Radhika Wedding Reception : रिलायन्स समूहाचे संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचे लग्न नुकतेच पार पडले. अनंतने राधिका मर्चंटसोबत १२ जुलैला लग्नगाठ बांधली. या जोडप्याचे लग्न अतिशय दिमाखदार पद्धतीने पार पडले. या लग्नाची देशभरातच नव्हे तर जगभरात चर्चा सुरू आहे.

लग्नानंतर या नवविवाहित जोडप्याचे १४ जुलैला (रविवार) वेडिंग रिसेप्शन पार पडले. या स्वागत समारंभाला मंगल उत्सव असे नाव देण्यात आले होते. या सोहळ्याला पुन्हा एकदा सेलेब्सची मांदियाळी पहायला मिळाली. या रिसेप्शनमधून नुकतीच अनंत-राधिकाची झलक पहायला मिळाली आहे. ज्यामध्ये राधिकाचा रॉयल अंदाज पुन्हा चर्चेत आला आहे. राधिकाचा ग्रॅंड रिसेप्शनचा लूक कसा होता? चला तर मग जाणून घेऊयात.

राधिकाचा रिसेप्शन लूक

या ग्रॅंड रिसेप्शनला राधिका मर्चंटने पुन्हा एकदा रॉयल अंदाजात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राधिकाने सोनेरी रंगाचा लॅव्हिश गाऊन परिधान केला होता. यासोबत तिने हेव्ही दुपट्टा कॅरी केला होता. तिचा हा सुंदर गाऊन डोल्से गब्बाना (Dolce Gabbana) आणि प्रसिद्ध डिझायनर अनामिका खन्ना यांनी डिझाईन केला होता. या गाऊनवर राधिकाने कॉर्सेट स्टाईल ब्लाऊज परिधान केला होता. तिचा हा लूक रिया कपूरने स्टाईल केला होता.

राधिका या गाऊनमध्ये कमालीची सुंदर दिसत होती. तिच्या या शिमरी गाऊनवर सोन्याचे जरदोसी वर्क होते. त्यासोबतच तिने गाऊनवर डॉल्से गब्बानाचा अल्टा मोडा सरदेग्ना २०२४ चा कॉर्सेट ब्लाऊज परिधान केला होता. ज्यावर एम्बॉयडरीचे बारीक वर्क करण्यात आले होते. या शाही पोशाखात रधिका खूपच सुंदर दिसत होती.

राधिकाचा मेकअप अन् हेअरस्टाईल

राधिकाने या अप्रतिम गाऊनवर केस मोकळे सोडले होते. तसेच, या गाऊनवर तिने मिनिमल मेकअप केला होता. या गाऊनवर तिने गळ्यात हिऱ्यांचे दागिने, कानातले आणि बांगड्या घातल्या होत्या. यादरम्यान तिच्या केसांमध्ये सिंधूर ही दिसून आले. ज्यामुळे, तिचा न्यू ब्राईड लूक आणखी खुलून दिसत होता. एकूणच तिचा हा एलिगंट लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता CJP ची नवी लढाई; अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा, नेमका काय प्लॅन? सरकारचं टेन्शन वाढणार?

भारतीय संघाच्या फिटनेसवर BCCI चा 'सर्जिकल स्ट्राईक'! सीनियर-ज्युनियर पाहू नका, सर्वांना एकच नियम... वाचा BCCI Fitness Standards

Maharashtra Politics: कल्याण-डोंबिवलीतील राजकीय समीकरण पालटले! शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश, एकनाथ शिंदेंना धक्का

Drug Disposal Pune : ड्रग माफियांना मोठा झटका ! पुणे अन् धुळ्यात मोठी कारवाई; ९,५३६ किलो अमली पदार्थांचा साठा नष्ट, मोठे रॅकेट उघड

राजपाल यादवने बँकेकडून सुद्धा घेतलेलं १६ कोटींचं कर्ज, ते पण फेडलं नाही? आता घराचा होणार लिलाव

SCROLL FOR NEXT