Anant Radhika Wedding  esakal
लाइफस्टाइल

Anant Radhika Wedding: १०० खासगी अन् ३ फाल्कन विमाने; अनंत-राधिकाच्या लग्नात पाहुण्यांना मिळणार लक्झरी ट्रीटमेंट

Guests at Anant Radhika's Wedding Will Receive Luxurious Treatment: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा शाही विवाहसोहळा १२ जुलैला मुंबईत पार पडणार आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Anant Radhika Wedding : भारताचे प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी हा राधिका मर्चंटसोबत १२ जुलैला विवाहबंधनात अडकणार आहे. या शाही विवाहसोहळ्यासाठी अंबानी कुटुंबाने जय्यत तयारी केली असून पाहुण्यांची ने-आण करण्यासाठी ३ फाल्कन-२००० जेट विमाने भाड्याने घेतल्याची माहिती समोर आली आहे.

एअर चार्टर कंपनी क्लब वन एअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन मेहरा यांनी यासंदर्भात रॉयटर्सशी बोलताना सांगितले की, अंबानी कुटुंबाने लग्नातील पाहुण्यांची ने-आण करण्यासाठी ३ फाल्कन-२००० जेट विमाने भाड्याने घेतली आहेत. विशेष म्हणजे या विवाहसोहळ्यासाठी १०० हून अधिक खासगी विमाने वापरण्यात येणार आहेत. या शाही लग्नासाठी प्रत्येक देशातून पाहुणे येणार आहेत, त्यामुळे, प्रत्येक विमान अनेक देशांमध्ये उड्डाण कऱणार आहे.

शनिवारी-रविवारी प्रमुख वाहतूक मार्गांवर निर्बंध

अनंत-राधिकाचा शाही विवाहसोहळा १२ जुलैला मुंबईतल्या BKC येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडणार आहे. १२-१५ जुलै दरम्यान दुपारी १ ते मध्यरात्रीच्या दरम्यान कार्यक्रमस्थळाजवळील रस्ते केवळ या कार्यक्रमातील उपस्थितांच्या वाहनांसाठी खुले असतील.

या संदर्भात मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी ३ दिवसांसाठी रस्त्यांवरील निर्बंधांबाबत तपशीलावर सूचना जारी केल्या आहेत. १२ जुलैला अनंत-राधिकाचा शाही विवाहसोहळ पार पडणार असून त्यापुढील २ दिवस आशीर्वाद आणि स्वागत समारंभ पार पडणार आहे.

अनंत-राधिकाच्या लग्नापूर्वी विविध कार्यक्रमांचे आयोजन

अनंत-राधिकाच्या लग्नापूर्वीच त्यांचे २ प्री-वेडिंग सोहळे मोठ्या उत्साहात पार पडले. त्यातील पहिला प्री-वेडिंग सोहळा हा गुजरात राज्यातील जामनगरमध्ये पार पडला. त्यानंतर, दुसरे प्री-वेडिंग इटली आणि फ्रान्समध्ये पार पडले.

या दोन्ही प्री-वेडिंग सोहळ्यांना हॉलिवूड, बॉलिवूडसहीत अनेक क्षेत्रांमधील व्यक्तींची मांदियाळी पहायला मिळाली होती. या लक्झरी कार्यक्रमानंतर मागील काही दिवसांपासून अनंत-राधिकाचे मुंबईत अनेक कार्यक्रम सुरू आहेत. या विविध सोहळ्यांना जागतिक कलाकार जसे की, जस्टिन बीबर, रिहाना, कॅटी पेरी, बॉय बॅंड बॅकस्ट्रीट बॉईज यांच्यासोबतच बॉलिवूडच्या कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT