Nita Ambani esakal
लाइफस्टाइल

Nita Ambani : 'माता की चौकीमध्ये' वरमाईंचा घरचोला साडीत खास लूक, नवरत्न चोकर अन् डायमंड हेअर ब्रोचने वेधले लक्ष.!

Nita Ambani : सोशल मीडियावर सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाची आणि लग्नाआधीच्या सोहळ्यांची चर्चा पहायला मिळत आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Nita Ambani : सोशल मीडियावर सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाची आणि लग्नापूर्वीच्या सोहळ्याची जोरदार चर्चा पहायला मिळतेय. प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज मुंबईत विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यापूर्वी, या दोघांच्या लग्नाआधीचे सोहळे आणि विधी मोठ्या उत्साहात पार पडले.

या सोहळ्यांना हॉलिवूड, बॉलिवूडसहीत इतर क्षेत्रांमधील दिग्गज व्यक्तींची हजेरी दिसून आली होती. ११ जुलैला अनंत-राधिकाची शिवशक्ती पूजा पार पडल्यानंतर, 'माता की चौकीचा' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या माता की चौकीच्या कार्यक्रमात नेहमीप्रमाणेच नीता अंबानींचा लाल साडीतला अप्रितम लूक व्हायरल झाला आहे. हा लूक कसा होता? चला तर मग जाणून घेऊयात.

नीता अंबानींचा लाल साडीतला स्पेशल लूक

माती की चौकीच्या कार्यक्रमातील नीता अंबानींच्या या खास लूकची झलक नीता अंबानींच्या हेअर स्टायलिस्टने तिच्या इन्स्टाग्राम हॅंडलवर शेअर केलीय. नीता अंबानींनी या कार्यक्रमात लाल रंगाची डिझायनर घरचोला साडी परिधान केली होती. ही साडी त्यांनी अनुराधा वकील यांच्या कलेक्शनमधून निवडली होती. या घरचोला साडीवर सोने आणि चांदीचे जरी वर्क केले असून, त्यावर कमळाच्या फुलांची सुंदर डिझाईन लक्ष वेधून घेतेय.

नीता यांची ही लाल रंगाची घरचोला साडी बेज-टोन्ड, हेव्ही नक्षीदार वर्कने सजली होती. या लाल रंगाच्या डिझायनर साडीवर नीता अंबानींनी गोल्डन-क्रीम रंगाचा डिझायनर ब्लाऊज परिधान केला होता. त्यावर देखील सोने-चांदीचे जरीवर्क करण्यात आले असून लाल रंगाच्या नक्षीदार बॉर्डरवर सुंदर काम करण्यात आले आहे.

नवरत्न हार अन् डायमंड हेअर ब्रोच

नीता अंबानी यांनी या सुंदर घरचोला साडीवर ज्वेलरी देखील तितकीच क्लास परिधान केली होती. या साडीवर नीता यांनी नवरत्न चोकर गळ्यात घातला होता. या हारामध्ये नीलम, पन्ना, हिरा आणि माणिक इत्यादी नऊ रत्ने जडवण्यात आली होती.

या चोकरला मॅंचिंग असलेले हिरेजडीत कानातले त्यांनी घातले होते. लाल रंगाच्या बांगड्या आणि हातातील पोल्की अंगठीने त्यांच्या लूकला चारचॉंद लावले होते. या साडीवर नीता यांनी ज्वेलरीसोबतच सुंदर मिनिमल मेकअप आणि क्लासी हेअरस्टाईल केली होती.

Nita Ambani

यासोबतच त्यांच्या लूकची आणखी एक गोष्ट लक्ष वेधून घेत होती ती म्हणजे त्यांनी हेअरबनमध्ये लावलेला डायमंड ब्रोच. या हेअर ब्रोचच्या मध्यभागी गणेशाची मूर्ती असून बाजूने मोती-डायमंडचे हेव्ही वर्क आहे. नीता अंबानींचा हा हिरेजडीत हेअर ब्रोच सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT