Anant Radhika Wedding esakal
लाइफस्टाइल

Anant Radhika Wedding : एका वृद्ध महिलेला स्टेजवर पाहून संपूर्ण अंबानी कुटुंबिय झुकलं, पण ती महिला कोण होती?

हा व्हिडिओ व्हायरल होताच अंबानी कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Anant Radhika Wedding :

अनंत राधिकाचा विवाह सोहळा नुकताच पार पडला आहे. ज्या लग्नाची अनेक वर्ष चर्चा होईल असाच हा विवाह सोहळा होता. कोणत्याबी प्रकारची कमी या लग्नात दिसली नाही. आता या लग्न सोहळ्याच्या रिसेप्शनचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये अनंत-राधिका एका सामन्य महिलेचा आशिर्वाद घेताना दिसत आहेत. ती महिला कोण असा प्रश्न आता सोशल मिडियावरील अंबानी चाहत्यांना पडला आहे.

सोशल मीडियावर अंबानी कुटुंबाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच अंबानी कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता ते ज्या पद्धतीने त्यांच्या कार्यक्रमांमध्ये आदरातिथ्य करत आहेत ते पाहून संपूर्ण जग प्रभावित झाले आहे. (Anant Radhika Wedding )

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाच्या फंक्शनचा एक खास व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये नवदाम्पत्यांनी सर्व लोकांसमोर एका सामान्य दिसणाऱ्या महिलेचे पायाला हात लावून आशिर्वाद घेतला आहे. ती महिला दुसरी-तिसरी कोणी नसून ती प्रसिद्ध म्हैसूर कॅफेची मालकीण आहे. या कॅफेचे आणि अंबानी कुटुंबियांचे अनेक वर्षांचे ऋणानुबंध आहेत.

श्रीमती शांतेरी नायक यांना पाहून अंबानी कुटुंब एकत्र आले आणि त्यांचे आदरातिथ्य दाखवले. अनंत आणि त्याची वहिनी श्लोका खूप आनंदात आहेत. अनंत आधी सर्वांना सांगतो की या म्हैसूर कॅफेची मालकीण आहेत. आणि मग तो लगेच त्याच्या पत्नीला बोलवतो ज्यामुळे त्याही नववधुला भेटू शकल्या.

यानंतर राधिकाने या वृद्ध महिलेचा हात धरला आणि डोके टेकवून तिचे आशिर्वाद घेतले. राधिका म्हणाली की, मी आठवड्यातील एक दिवस त्यांच्या हॉटेलमध्ये जेवते. अनंत अंबानी आणि श्लोका मेहता ज्या प्रकारे या वृद्ध महिलेला आदर देत आहेत आणि तिच्या चरणांना स्पर्श करत आहेत, ते पाहून या कुटुंबाबद्दल लोकांचा आदर आणखी वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Municipal Election: ठाणे जिल्ह्यात भाजपची घोडदौड, ६ पैकी ३ पालिकांवर झेंडा, दोन ठिकाणी शिंदे सेना

नव्या मालिका सुरू होऊन आठवडा उलटत नाही तोच स्टार प्रवाहने केली नव्या मालिकेची घोषणा, प्रोमोची होतेय चर्चा

आई–मुलींच्या नात्याच्या नाजूक छटा उलगडणारा ‘तिघी’चा भावस्पर्शी टीझर प्रदर्शित

Elephant Viral Vieo : नदीत वाहून चालले होते हत्तीचे पिल्लू, आईने 'असा' वाचवला जीव, भावूक व्हिडिओ

Malegaon Municipal Election : मालेगाव महापालिकेत राजकीय भूकंप; इस्लाम पक्ष सर्वात मोठा, भाजप-काँग्रेसला जोरदार धक्का

SCROLL FOR NEXT