Anarkali Suit Fashion esakal
लाइफस्टाइल

Anarkali Suit Fashion : लग्नापासून ते कॅज्यूअल वेअरपर्यंत सर्वांसाठी परफेक्ट असा एकमेव सूट

अनारकली ड्रेसची फॅशन कितीतरी वर्ष झाले आलेली आहे

सकाळ डिजिटल टीम

Anarkali Suit Fashion : अनारकली ड्रेसची फॅशन कितीतरी वर्ष झाले आलेली आहे आणि आजही तिला तेवढीच लोकप्रियता आहे; याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे हे ड्रेसेस आपण अगदी मोठमोठ्या लग्नसमारंभापासून तर रोजच्या डेली वेअरपर्यंत कुठेही घालू शकतो. हे सूट खूप सुंदर दिसतात, अगदी सेलेब्रिटींनाही यांचा मोह आवरला नाहीये, छोट्या लहान मुलींपासून मोठ्या बायकांपर्यंत अगदी प्रत्येकासाठी बाजारात हे सूट उपलब्ध आहे.

अशात आता अनारकली मध्ये खूप प्रकार आलेले आहेत, त्यात आपण नक्की कोणत्या पद्धतीचा अनारकली सूट घ्यावा किंवा शिवावा याच थोडसं कन्फ्युजन होतच असेल, त्यामुळे तुम्ही या स्टाईलचे ड्रेसेस घेऊ शकतात.

1. डिजायनर एथेनिक अनारकली सूट

सर्वात सुंदर आणि बहुदा खऱ्या अनारकलीचा लुक देणारा हा प्रकार आहे. सुरुवातीला अनारकली ड्रेसेस हे फक्त लग्नसमारंभासाठी किंवा पार्टी साठी घातले जायचे तेव्हा हा लुक खूप रॉयल दिसत होता. तुम्हीही तुमच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी हा ड्रेस घालू शकतात.

2. शॉर्ट अनारकली ड्रेस

हा ड्रेस गुडघ्यांपर्यंत येतो, याच्या खाली तुम्ही पलाजो किंवा स्कर्ट घालू शकतात. जर तुम्हाला पायघोळ अनारकली ड्रेस आवडत नसेल तर ड्रेस तुमच्यासाठी परफेक्ट आहे.

3. अनारकली फ्रॉक स्टाईल ड्रेस

सध्या ट्रेडीशनल ड्रेसेस मध्ये लॉन्ग फ्रॉक घालण्याची फॅशन सुरूच आहे, अशात तुम्ही वन पीस सारखे अनारकली ड्रेसेस घेऊ शकतात. हे दिसायलाही सुंदर आणि फॅशनेबल दिसतील.

4. जॅकेट स्टाईल अनारकली ड्रेस

सध्या जॅकेटची सुद्धा खूप स्टाईल सुरू आहे, आणि बाजारात तुम्हाला नक्कीच सुंदर जॅकेट स्टाईल अनारकली ड्रेस बघायला मिळतील, हे अगदी तुमच्या रेग्युलर किंवा ऑफिस लुक साठी परफेक्ट आहेत.

5. सिंपल अनारकली ड्रेस

जर तुम्हाला असे झगमगित ड्रेसेस आवडत नसतील तर तुम्ही हे सिंपल अनारकली ड्रेसेस घेऊ शकतात, हे तुमच्या ऑफिस लुकसाठी परफेक्ट आहेत आणि दिसायलाही सुंदर दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT