Anti Pimple Drinks esakal
लाइफस्टाइल

Anti Pimple Drinks : पिंपल्स घालवताय तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य? रोज प्या हे ड्रिंक, दिसाल अगदी ग्लोइंग

चेहऱ्यावर जास्त पिंपल्स येऊ लागले की नंतर ते काळ्या डागांमध्ये रुपांतरित होतात, ज्याचा चेहऱ्याच्या सौंदर्यावर खूप वाईट परिणाम होतो

सकाळ ऑनलाईन टीम

Anti Pimple Drinks : चेहऱ्यावर जास्त पिंपल्स येऊ लागले की नंतर ते काळ्या डागांमध्ये रुपांतरित होतात, ज्याचा चेहऱ्याच्या सौंदर्यावर खूप वाईट परिणाम होतो. पण तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. यासाठी खाण्यापिण्यात बदल केले जाऊ शकतात, ज्यामुळे या समस्येवर लवकरच मात करता येईल.

अँटी पिंपल्स ड्रिंक्स देईल पिंपल्सपासून आराम

चेहऱ्यावर येणाऱ्या फोडांसाठी तुम्ही अँटी पिंपल्स ड्रिंक्स पिऊ शकता, जर ते रोज सेवन केले तर पिंपल्स, डाग आणि मुरुम यासारख्या समस्यांपासून लवकरच आराम मिळेल.

1. ग्रीन टी आणि लिंबू

ग्रीन टी अनेकदा वजन कमी करण्याची रेसिपी मानली जाते, पण जर तुम्ही लिंबू घालून प्यायलात तर ते त्वचेसाठीही फायदेशीर ठरू शकते. ग्रीन टी तयार केल्यानंतर त्यात लिंबाचा रस पिळून गाळून प्या. ग्रीन टीमध्ये असलेले ऑक्सिडंट्स आणि लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेला स्वच्छ करतात, ज्यामुळे पिंपल्स लवकर निघून जातात.

2. आवळा आणि आल्याचं ड्रिंक

केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी आपण आवळा वापरतो, पण त्यात असलेले व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म मुरुमांमुळे होणारे जंतू काढून टाकण्यास मदत करतात. आवळ्याचा रस आणि आले एकत्र करून प्यायल्यास डाग तर दूर होतातच शिवाय त्वचेला अप्रतिम ग्लोही येतो.

3. कडुलिंब आणि मध

कडुलिंबाचे औषधी गुणधर्म आपण सर्वच जाणतो, या झाडाचा प्रत्येक भाग आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. कडुनिंबाच्या पानांपासून तुम्ही अँटी-बॅक्टेरियल ड्रिंक तयार करू शकता आणि जर तुम्ही ते प्याल तर मुरुम नैसर्गिकरित्या नाहीसे होऊ लागतात. कडुलिंब खूप कडू असल्याने पेयात मध टाकून प्या.

चेहऱ्यावरील पिंपल्सना हाताने फोडण्याची चूक करू नका त्याचे डाग फार गडद असतात. आणि ते लवकर जात नाहीत. त्यामुळे तुमचा चेहरा विचित्र दिसू शकतो. तसेच बाहेरील धुळाचे हात चेहऱ्याला लावण्याआधी ते स्वच्छा धुणे तितकेच महत्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT