bollywood brides chose pastel pink lehenga 
लाइफस्टाइल

अनुष्काचा वेडिंग लूक अभिनेत्रींकडून कॉपी, पाहा पेस्टल पिंक रंगाचे डिझायनर लेहंगा

शर्वरी जोशी

प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहने नुकतीच टीव्ही अँकर संजना गणेशनसोबत लग्नगाठ बांधली. त्यामुळे सध्या या दोघांची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. या चर्चांमध्ये संजनाने परिधान केलेला लेहंगा अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. संजनाचा हा लेहंगा अभिनेत्री अनुष्का शर्माच्या वेडिंग लूकप्रमाणेच आहे. त्यामुळे सेलिब्रिटींमध्ये पेस्टल पिंक रंगाच्या लेहंगाचा ट्रेण्ड सुरु असल्याचं जाणवत आहे. यापूर्वी अनेक अभिनेत्रींनी याच पद्धतीने वेडिंग लूक केला असून या अभिनेत्री कोण ते जाणून घेऊयात.

१. अनुष्का शर्मा -

अभिनेत्री अनुष्का शर्माने २०१७ मध्ये क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली होती. इटलीमध्ये लग्नगाठ बांधणाऱ्या अनुष्काने प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाची यांनी डिझाइन केलेला लेहंगा परिधान केला होता. हा लेहंगा तयार करण्यासाठी ३२ दिवस लागले होते. इतकंच नाही तर ६७ कारागीरांनी मिळून तो तयार केला होता. पेस्टल पिंक रंगाचा हा लेहंगा अनेक तरुणींमध्ये लोकप्रिय झाला असून अनेक अभिनेत्रीनादेखील त्याची भूरळ पडली. त्यामुळेच काही अभिनेत्रींनी सेम याच पद्धतीचा लेहंगा परिधान केल्याचं दिसून आलं.

२. नेहा धुपिया -

अभिनेत्री नेहा धुपियाने २०१८ मध्ये अंगद बेदीसोबत लग्नगाठ बांधली. नेहानेदेखील अनुष्काप्रमाणेच पेस्टल पिंक रंगाचा लेहंगा परिधान केला होता. हा लेहंगा फॅशन डिझायनर अनिता डोंगरेने डिझाइन केला होता.

३. मीरा राजपूत -

अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने तिच्या लग्नात सेम टू सेम अनुष्का आणि नेहाप्रमाणेच पेस्टल पिंक रंगाचा लेहंगा परिधान केला होता. हा लेहंगा फॅशन डिझायनर अनामिका खन्नाने डिझाइन केला होता.

४. नेहा कक्कर -

नेहा आणि रोहनप्रीत यांचा विवाहसोहळा २०२० मधील सर्वात चर्चेत राहिलेला विवाहसोहळा असल्याचं म्हटलं जात आहे.

या लग्नातील काही सोहळ्यांमध्ये नेहाने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला कॉपी केल्याचं म्हटलं जातं. परंतु, नेहाला हा लेहंगा सब्यासाची यांनी गिफ्ट दिला होता.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT