Appraisal google
लाइफस्टाइल

Appraisal Tips : अप्रेजल जवळ आलंय; बॉसला या गोष्टी सांगाल तर मिळेल भरगोस पगारवाढ

तुमच्या कामाची नोंद नेहमी ठेवा. यामुळे तुम्ही तुमच्या बॉसला तुमच्या सर्व प्रोजेक्ट्सबद्दल सहज सांगू शकाल.

नमिता धुरी

मुंबई : बहुतेक कंपन्या फेब्रुवारी ते मार्च महिन्यात त्यांच्या कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन (appraisal) करतात. कर्मचारी वर्षभरापासून या वेळेची वाट पाहात असतात.

मूल्यांकनापूर्वी एक मीटिंग होते. यात तुमच्या कामाबाबत तुम्हाला बॉसशी चर्चा करावी लागते. या चर्चेत काय बोलायचे, काय सांगायचे, बॉसला कामाबाबत प्रभावित कसे करायचे, हे जाणून घेऊ.  हेही वाचा - मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

स्वतःला अपयशी समजू नका

बर्‍याच वेळा तुमचा बॉस तुम्हाला सांगतो की तुम्ही जे केले आहे, त्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःला अपयशी समजू नका.

अशा वेळी तुम्ही तुमचे आतापर्यंत केलेले सर्व काम दाखवावे. तरच तुम्हाला अपेक्षित मूल्यांकन मिळेल.

कामाची नोंद ठेवा

तुमच्या कामाची नोंद नेहमी ठेवा. यामुळे तुम्ही तुमच्या बॉसला तुमच्या सर्व प्रोजेक्ट्सबद्दल सहज सांगू शकाल. तुमच्या कामाचा आवाका किती आहे याची बॉसला कल्पना येऊ शकेल.

आत्मविश्वास बाळगा

तुमच्या कामाबाबतच्या भविष्यातील नियोजनाबाबत सांगा. तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास असू द्या. बॉसला आत्मविश्वासू माणसे आवडतात.

नकारात्मकता बाळगू नका

एखादं काम होऊच शकत नाही. ते कठीणच आहे किंवा 'मी मुलगी आहे मग हे काम कसं करणार', 'मी लहान आहे', अशाप्रकारची नकारात्मक वक्तव्ये करू नका.

अशा पद्धतीने बॉसशी चर्चा केल्यास चांगली पगारवाढ मिळू शकेल. तसेच वर्षभर कामाचे सातत्य ठेवा. त्यामुळे अप्रेजल मीटिंगमध्ये तुमची वर्तणूक खोटी वाटणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who Is Nitin Nabin: दिल्लीच्या राजकारणात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; भाजपचे सर्वात तरुण कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन कोण?

Lionel Messi: मेस्सीसाठी स्वागत, पण भारतीय खेळाडूंची ओळख पुसली! भारतीय फुटबॉलसाठी धक्कादायक क्षण

Solapur Crime:'साेलापुरात नवविवाहितेचा दहा लाख रुपयांसाठी छळ'; सात जणांवर गुन्हा दाखल, जाचहाट व छळ अन्..

छावणीच्या थकीत बिलाबाबत सरकारची ‘तारीख पे तारीख’; ‘इन्साफ कब मिलेगा’ म्हणत सत्ताधारीच अधिवेशनात आक्रमक !

Latest Marathi News Live Update: काळ बदलतो, पण 'नंबर १०' वानखेडे स्टेडियमची शोभा वाढवतच आहे - फडणवीस

SCROLL FOR NEXT