Fashion
Fashion 
लाइफस्टाइल

फॅशन + : ट्रेंड शर्टड्रेसचा...

सकाळवृत्तसेवा

उन्हाळ्यात फॅशनमध्ये अनेक ट्रेंड येतात. त्यापलीकडेही मुलींच्या वॉडरोबमध्ये कपड्यांचे हे काही एव्हरग्रीन प्रकार असलेच पाहिजेत. ते तुम्ही कोणत्याही सिझनमध्ये आणि कोणत्याही दिवशी घालून फॅशन करु शकता. सध्याच्या फॅशनमधील असाच ट्रेंडिग प्रकार म्हणजे ‘शर्टड्रेस’. सेलिब्रिटींपासून अगदी सर्वच मुलींना भुरळ घातेल्या या ‘शर्टड्रेस’ विषयी जाणून घेऊया... 

शर्टड्रेस म्हणजे काय ?
शर्टड्रेस हा थोडासा सैलसर आणि ढगळा असा गुडघ्यापर्यंतचा ड्रेस आहे. त्यावरील प्रिंट सहसा एखाद्या शर्टप्रमाणे लाइनिंग किंवा चेक्सची असते.
शर्ट ड्रेसचा फॅशन ट्रेंड खूप जुना आहे, असे समजू नका. हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये या ट्रेंडची चलती आहेच. कॅज्युअल लुक देणारा हा शर्टड्रेस तुम्ही सहज कॅरी करू शकता. या सर्व पॅर्टनमध्ये डिझाइन वेगवेगळे असले, तरी काही गोष्टी कॉमन असतात.

  • साधारणपणे या ड्रेसमध्ये शर्टप्रमाणे बटणे असतात. अनेकदा ती ड्रेसनुसार गुडघ्यापर्यंत असतात.
  • स्लिव्हस या पूर्ण किंवा हाताच्या कोपरापर्यंत असतात.
  • इतर वनपिसप्रमाणे बॉडी फिटिंग नसून, तो सैलसर असतो.

कशी कराल फॅशन ?
शर्टड्रेसमध्ये अनेक पॅर्टर्न बाजारात उपलब्ध आहेत. चेक्स, वर्टीकल लाइनिंग, डेनिम, फ्लोरल, एम्ब्रॉइडरी एलिगन्स, रेट्रो, फिश कट, प्लेन व्हाइट अशा भरपूर व्हराइटी आहेत. तुम्ही कोणत्या जागी किंवा ऑकेजनला जात आहात, त्याप्रमाणे पॅर्टन निवडा. डेटवर जात असल्यास फ्लोरल, ऑफिससाठी लाइनिंग, बाहेर फिरण्यासाठी फिश कट असे प्रकार निवडा.

  • शर्ट ड्रेससोबत बेल्ट लावल्यास अधिक ट्रेंडी दिसतो. 
  • ऑफिसच्या लुकसाठी हिल्स तर, इतर दिवशी स्निकर्स किंवा शूज घाला.
  • यासोबत कोणतीही अक्सेसरीज वापरु नका. फक्त केस मोकळे ठेवा.
  • केस मोकळे ठेवणार नसल्यास मेसी हेअर बन करा. यालाच एक पर्याय म्हणजे वेणीही घालू शकता.
  • या ड्रेससोबत ओव्हरसाइज हॅंडबॅग कॅरी करा.
  • ए-लाईन शर्ट ड्रेसवर एखादा निऑन रंगाचा बेल्ट घातल्यास कॅज्युअल लुक मिळतो.

ट्रेंडी कलर्स
शर्ट ड्रेसमध्ये साधारण सॉलिड रंग नसतात. निळा, काळा, पांढरा, राखाडी, आर्मी ग्रीन, ऑलिव्ह ग्रीन, रिच रेड, पिच असे रंग पाहायला मिळतात. प्रसंगाप्रमाणे रंग निवडा. मुलाखतीसाठी डार्क ब्लू किंवा राखाडी रंग निवडू शकता. बाहेर फिरण्यासाठी पांढरा, ऑलिव्ह ग्रीन, डेनिम, पिच किंवा काळा योग्य ठरेल. तर, रिसेप्शन, कार्यक्रम किंवा पार्टीसाठी रिच रेड, काळा, डार्क ग्रीन असे रंग निवडा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT