Gauri-Kulkarni
Gauri-Kulkarni 
लाइफस्टाइल

सेलिब्रिटी वीकएण्ड : शॉपिंग, फिरणं आणि गप्पाटप्पा

गौरी कुलकर्णी, अभिनेत्री

सध्या लॉकडाउनमुळे आणि आत्ताच्या अनलॉकमुळे मला वीकएण्ड म्हणावा तसा सेलिब्रेट करता आला नाही. बाहेर जाऊन पाणीपुरी खाणं, भेळपुरी खाणं जमलेलं नाही. त्यामुळे माझ्या मनात खूप रुखरुख लागलेली आहे. परंतु, यापूर्वी वीकएण्ड्सना मी खूप धमाल केली आहे. अगदी एन्जॉय.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माझी टू-व्हीलर आहे. ती टू-व्हीलर मी वीकएण्डला बाहेर काढते. कारण, एरवी शूटिंग असल्यामुळे कारने शूटिंगला जाते. परंतु, शूटिंग नसेल तर टू-व्हीलर माझी सोबतीला असते. मी ठाण्यात राहायला आहे. त्यामुळे तलाव पाळीला जाणे किंवा एखाद्या मॉलमध्ये खरेदीला जाणे सुरू असते. मी टू-व्हीलरवर कुठेही अशा प्रकारे जात असते. त्याकरिता काही प्लॅनिंग वगैरे नसते किंवा सोबतीला कुणीही नसते. मी एकटीच जात असते आणि सेलिब्रेशन करीत असते. एक दिवस वीकएण्डला आमच्या मालिकेतील (‘ऑलमोस्ट सुफल संपूर्ण’) आम्ही सगळे कलाकार जुहू चौपाटीला फिरायला गेलो होतो. तेथे आम्ही खूप एन्जॉय केले. पाणीपुरी खाल्ली. पावभाजीवर ताव मारला आणि बर्फाचा गोळादेखील खाल्ला. आम्ही इतकी काही धमाल केली, की विचारू नका. मग आमच्या गप्पाटप्पा रंगल्या. त्या दिवशीचा शनिवार आम्ही सगळ्यांनी रात्रभर एन्जॉय केला आणि दुसऱ्या दिवशीचा रविवार सगळ्यांनी घरी झोपून काढला. कारण, आम्हाला चित्रीकरणाला दोन दिवस सुट्टी होती आणि ते दिवस आम्ही मजेत घालविले. 

कधी कधी वीकएण्डला मी माझ्या घरी नगरला जाते आणि तिथे गेल्यानंतर काय सांगू?... सकाळी उशिरा उठणे, आई आणि आजीच्या हातचे विविध पदार्थ खाणे. एवढेच नाही तर माझे बाबादेखील माझ्यासाठी काही तरी खायला आणणार किंवा स्वतः बनवून मला खायला देणार. तो वीकएण्ड माझा लय भारी आणि एन्जॉयेबल असतो. ठाण्यात मी आणि माझी मैत्रीण राहतो. त्यामुळे जेवण वगैरे आम्हालाच बनवावे लागते. मग कधी कधी कंटाळा आला, की मी गाडी घेऊन बाहेर जाते आणि पिझ्झा किंवा बर्गर खाते. 

शॉपिंगची मला आवड आहे. एखादी गोष्ट आवडली, की नक्कीच खरेदी करते. कधी कधी मित्र-मैत्रिणी भेटले, की आम्ही खूप गप्पा मारतो. आता लॉकडाउनमध्ये मला माझ्या जुन्या मित्र-मैत्रिणींना व्हिडीओ कॉल्सद्वारे भेटता आले. चित्रपटांचे म्हणाल, तर मी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहते. ‘मिशन मंगल’ वगैरे चित्रपट मी पाहिलेले आहेत. शनिवारी किंवा रविवारी सुट्टी असेल, तर हिंदी किंवा मराठी चांगला सिनेमा मी पाहते.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

SCROLL FOR NEXT