Ashadhi Wari 2023 esakal
लाइफस्टाइल

Ashadhi Wari 2023 : अनेक वर्षे विठ्ठलाच्या मंदिरात घडतोय हा चमत्कार, तुम्हाला माहितीय का?

पंढरपुरातील विठ्ठलाचे मंदिर उघडल्यानंतर देवाला उठवण्यासाठी प्रार्थना म्हटली जाते

Pooja Karande-Kadam

Ashadhi Wari 2023 : पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात.

क्षेत्रमाहात्म्यामुळे पंढरपुराला दक्षिण काशी म्हणतात. हे विठ्ठलमंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तिस्थान आहे. गोरगरिबांचा देव म्हणून विठ्ठलाची ओळख आहे. पंढरपूरच्या उत्तर दिशेला कैकाडी महाराज यांचा मठ आहे तिथे गुंफेत सर्व साधु संतांच्या मूर्ती आहेत.

देशभरातील वारकरी विठ्ठल मंदिरात जमतात आणि मनभरून विठोबाचं दर्शन घेतात. गेली अनेक वर्षे विठोबाच्या देवळात एक चमत्कार घडत आहे. पण त्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आज आपण त्याबद्दल माहिती घेऊयात.

महाराष्ट्राचे आराध्यदैवत प्रभु विठ्ठल पांडुरंगाची आषाढी एकादशी निमित्त शासकीय महापूजा ही महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री करतात. ती सर्वोच्च शासकीय महापूजा असते. दररोज पहाटे चार वाजता पंढरपुरातील विठ्ठलाचे मंदिर उघडल्यानंतर देवाला उठवण्यासाठी प्रार्थना म्हटली जाते. प्रार्थनेचे मंत्र काकड्याच्या वैदिक आणि पौराणिक मंत्रांप्रमाणे असतात. सव्वाचार वाजता काकड्याला सुरुवात होते. कान्ह्या हरिदास रचित ‘अनुपम्य नगर पंढरपूर’ ही आरती म्हटली जाते.

आरतीनंतर देवाला खडीसाखर आणि लोण्याचा प्रसाद दाखवला जातो. नंतर नित्यपूजा सुरू होते. त्यामध्ये प्रथम संकल्प, गणेशपूजा, भूमिपूजा, वरुणपूजा, शंखपूजा, घंटापूजा होते. त्यानंतर पुरुषसूक्ताचे पठण करत पूजा केली जाते. सकाळी ११ वाजता विविध पक्वान्नांचा महानैवेद्य दाखवला जातो.

विठोबा मंदिरात जमलेले शेकडो भाविक तन्मयतेने 'उठा उठा विठूराया' भूपाळी म्हणत असतात. विठूरायाजवळचे सेवेकरी पूजेच्या तयारीला लागलेले असतात. भगवंतांचे पादप्रक्षालन होते, आचमन दिले जाते. पुजारी देवाच्या अंगावरील हार-फुले काढून टाकून त्याजागी ताजे हार, पुष्पे व तुळशीपत्र पांडुरंगास अर्पण करतात.

काय आहे चमत्कार

देवास गंध लावतात. विठ्ठलाच्या अंगावरील वस्त्रे नीट करून धूप, दीप व लोणी खडीसाखरेचा, लाडू- दुधाचा भोग दाखवितात. यानंतर गाईच्या तुपात भिजविलेल्या खादीच्या नव्या कापडाने मध्यंतरात विठ्ठलांच्या मुखी लोण्याचा गोळा व तुलसीपत्राबून केली जाते. विशेष म्हणजे लोण्याचा गोळा खाली पडत नाही. तर तो विठोबाच्या ओठांवरच राहतो. तो काढायचा म्हटलं तर पुजाऱ्यांना हातानेच काढून घ्यावा लागतो.

विशेष गोष्ट अशी की, जर ते लोणी शिळे असेल तर ते मुर्तीच्या मुखाला राहत नाही. लगेचच खाली पडते. या नैवेद्यानंतर विठोबाला अभ्यंगस्नानानंतर श्रीवास संपूर्ण भरजरी पोशाख केला जातो. चंदनाचे लावून केशर कस्तुरी टिळा लागला जातो. नंतर धूप दीप लावला जातो.

पंढरपूरमध्ये वर्षातून चैत्री, आषाढी, माघी व कार्तिकी अशा चार एकादशी होतात. त्यावेळी पंढरपुरात यात्रा भरतात . त्यातील आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत १०-१५ लाख भाविक सहभागी होतात. पंढरपुराला मराठी संस्कृती घडविणाऱ्या थोर भागवतधर्मीय संतांनी नावारूपास आणलेले महाराष्ट्राचे आद्य व पवित्र तीर्थक्षेत्र मानतात.

पुंडलिकाच्या काळात विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर भीमा नदीच्या पात्रात पश्चिमाभिमुखी हरिमूर्ती होती असे मानले जाते. हे मंदिर आता वाहून गेले आहे. पण त्याचा मोठा चौथरा शिल्लक आहे, त्याला चौफाळा म्हणतात.

नित्योपचारातील शेवटचा उपचार म्हणजे शेजारती. रात्री साडेअकरा ते पावणेबाराच्या सुमारास शेजारती केली जाते. प्रथम विठ्ठलमूर्तीची पाद्यपूजा होते. त्यानंतर देवाला दुपारी घातलेला पोषाख बदलला जातो. धोतर नेसवून अंगावर उपरणे घातले जाते. डोक्‍याला पागोटे बांधले जाते. पोषाख बदलत असताना देवाच्या आसनापासून शेजघरापर्यंत पायघड्या घातल्या जातात.

देवाला गंध लावून नंतर हार घालतात. त्या वेळी ‘हरि चला मंदिरा ऐशा म्हणती गोपिका’ इत्यादी आरत्या म्हटल्या जातात. शेवटी मंत्रपुष्पांजली म्हणून देवाला फुले अर्पण केली जातात आणि शेजारती संपते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India suspends postal service to US: भारताने घेतला मोठा निर्णय! आता अमेरिकेसाठी ‘पोस्टल सर्विस’ बंद

National Space Day : भारताची भविष्यातली अंतराळ झेप कशी असेल? इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमांची A टू Z माहिती, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी प्रदान

BEST Bus: गणेशोत्सवासाठी बेस्टची मोठी घोषणा, रात्री चालणार विशेष गाड्या; कधी आणि कुठे? जाणून घ्या

ODI World Cup 2027 साठी ठिकाणं ठरली! 'या' शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

SCROLL FOR NEXT