Ashadhi Wari  esakal
लाइफस्टाइल

Ashadhi Wari 2024 : वासूदेवाची भविष्यवाणी खरी ठरली अन् गोव्यात पांडूरंगाचे मंदिर उभे राहिले

या मंदिराच्या निर्माणाची एक सत्यकथा आहे

Pooja Karande-Kadam

Ashadhi Wari 2024 : कोकण भूमितील गोवा निसर्ग संपन्नतेनेचे वरदान लाभलेला असाच आहे. गोवा जगभरातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेले राज्य आहे. दरवर्षी कोट्यवधी पर्यटक गोव्यात येत असतात. गोवा केवळ कॅसिनो, बीच, पर्यटन एवढापुरता मर्यादित नाही. तर गोव्याला एक अलौकिक असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे.

गोव्यातील प्राचीन मंदिरे अगदी वैशिष्ट्यपूर्ण आणि स्थापत्यकलेबद्दल प्रख्यात आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये भरपूर जैवविविधता आहे. गोव्यात हिंदू सण-उत्सव, प्रथा-परंपरा, व्रत-वैकल्ये मोठ्या प्रमाणात साजरी केली जातात. पोर्तुगीजांच्या ४०० वर्षांच्या जुलमी राजवटीनंतरही गोव्याने आपली संस्कृती जपण्याचे काम समर्थपणे केले आहे.

गोव्याच्या कानाकोपऱ्यामध्ये अशी काही मंदिरे आहेत त्यांची गणना जागृत देवस्थानांमध्ये केली जाते. संकटसमयी अडल्या-नडल्या वेळी देवांनी रक्षण केल्याच्या घटना तेथे घडलेल्या आहेत.  डिचोली तालुक्यातील आमोणे हा असाच एक गाव. शेतीने व्यापलेला.

देव-देवतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गावामध्ये देव बेताळ, भूतनाथ, श्री अमृतेश्वर, श्री सातेरी, श्री गणेश, महालक्ष्मी, रवळनाथ, रुपो देव यांची लहान-मोठी मंदिरे आहेत. नवसाला पावणारे, संकटसमयी भक्ताच्या हाकेला धावून जाणाऱ्या जागृत देवस्थानांचे ‘माहेरघर’ म्हणून आमोणे गावाची ख्याती आहे. 

गोव्यातील साखळीपासून ८ कि.मी.व माशेलहून फक्त दीड किमी.अंतरावर आहे. माशेलहून साखळीस जाताना आमोणे पुलाच्या पुढील डाव्या बाजूकडील रस्त्यावरून विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात फक्त दहा मिनिटात जाता येते.

या मंदिराच्या निर्माणाची एक सत्यकथा आहे. डिचोली तालुक्यातील आमोणे या गावी अनेक मंदिरे आहेत. पण श्रीविठु- माऊलीचे मंदिर नव्हते. त्यामुळेच तिथे मंदिर व्हावे अशी गावकऱ्यांची इच्छा होती. पण, त्यासाठी पुढाकार कोणी घेत नव्हते. अनेक वर्ष हा गावकऱ्यांची ही इच्छा प्रलंबित होती.

एके दिवशी आमोणे गावात एक वासुदेव आला होता. अनेक घरे फिरून तो प्रेमानंद नाईक (घाडीवाडा) यांच्या घरी आला. वासुदेव महाराजांनी प्रेमानंदचा परिचय करून घेतला. प्रेमानंद  यांनीही वासुदेवांचा पाहुणचार अगदी मनोभावे केला. प्रेमानंद यांना विठ्ठलाची ओढ असल्याचे महाराजांनी ओळखले.

तेव्हा वासुदेवांनी, या देवभूमीत आमोणे गावात तुझ्या हातून विठ्ठलाचे मंदिर उभे राहणार, अशी भविष्यवाणी केली. विठुमाऊलीच्या मंदिराचा विचार तू तुझ्या मित्रमंडळींना सांगून टाक. तू एकट्याने मंदिराचे काम करू नकोस. अनेकांच्या संमतीने व त्यांच्या अर्थसाहाय्याने मंदिराचे काम कर, असेही महाराजांनी सांगितले.

सर्वांच्या सहकार्याने हे मंदिर पुर्णत्वास आले तर ते सर्वांचेच होईल, असे सांगून वासुदेव महाराज निघून गेले. त्यानंतर लगेचच प्रेमानंद यांनी मित्र, गावकरी यांना हा विषय सांगितला. हळूहळू नागरिकांना हा विषय पटत गेला. निधी गोळा होऊ लागला. प्रेमानंदने आपली जागा मंदिरासाठी दिली.

आठ-दहा वर्षांपासून माशेल, सांगे, मुळगाव व गोव्यातील अनेक गावातील वारकरी पंढरपूरला जातात. आमोणे गावातील वारकरी मुळगावच्या वारकरी मंडळात सामील होऊन पंढरपूरला जात असत. प्रवासात अल्पोपाहार, जेवणा-खाण्याची सोय तसेच झोपण्याची सोय मठ, मंदिर सभागृहात केली जाते. गोव्यातून साडेतिनशे किलोमीटरचे अंतर चालून पंढरपूरला पोहोचायला १२ दिवस लागतात.

गोव्यातल्या या मंदिरात आषाढी, कार्तिकी एकादशीला येथे मोठा उत्सव असतो. जवळपासच्या गावातून अनेक भाविक येथे गर्दी करतात. हे मंदिर आता बांधलेलं असलं तरी या मंदिराची रचना गोव्यातील इतर मंदिरांसारखीच भव्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: स्वतःला शिवरायांचे मावळे म्हणता अन्...; आंदोलकांचं महिला पत्रकारसोबत गैरवर्तन, पत्रकार संघटनेचं जरांगेंना इशारापत्र

Pune Rain Update: पुण्यात रिमझिम पावसाचे आगमन; ढगाळ वातावरण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तान भूकंपाने हादरले, ९ जणांचा मृत्यू;पाकिस्तानपासून दिल्लीपर्यंत धक्के

Live Breaking News Updates In Marathi: नागपूर : ओबीसी महासंघाचं आंदोलन आणि भुजबळ यांच्याशी चर्चा

Deputy CM Eknath Shinde: मराठा आरक्षणाबाबत नियमातून मार्ग निघेल: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; शरद पवारांनी आतापर्यंत काय केले?

SCROLL FOR NEXT