Ashadhi Wari 2024 : esakal
लाइफस्टाइल

Ashadhi Wari 2024: संत तुकाराम महाराजांचा रथ ओढणार गुलाब अन् मल्हार; जाणून घ्या बैलजोडीची निवड कशी केली जाते?

Ashadhi Wari 2024: यंदा तुकाराम महाराजांची पालखी ओढण्याचा मान नांदेड सिटी येथील निखिल कोरडे या कुटुंबातील बैलांना मिळाला आहे

सकाळ डिजिटल टीम

Ashadhi Wari 2024 :

आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. देहूतून २.३० वाजता पालखी हलणार आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी ओढण्याचा मान यंदा पुण्यातील खडकवासला येथील गुलाब अन् मल्हार या बैलजोडीला मिळाला आहे.

यंदा तुकाराम महाराजांची पालखी ओढण्याचा मान नांदेड सिटी येथील निखिल कोरडे या कुटुंबातील बैलांना मिळाला आहे. यंदा पालखीचा रथ ओढण्यासाठी संस्थानकडे 27 अर्ज आले होते. त्यापैकी यांच्या बैलजोडींची निवड झाली आहे. (Ashadhi Wari 2024)

खिलार जातीची ही बैलं असून ती कर्नाटकातून आणली आहेत. गेली सात वर्ष कोरडे कुटुंबिय या बैलांचे संगोपन करत आहेत.

कशी होते बैलजोडीची निवड

तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये पुणे जिल्ह्यामधील कोणतेही कुटुंब पालखी रथाच्या बैलजोडीचा मानासाठी अर्ज भरू शकतात. यामध्ये रीतसर अर्ज भरून संस्था आणि डॉक्टरांची टीम योग्य अशा खिल्लार बैलांची निवड करतात.  

दरवर्षी २ वेगवगेळ्या कुटुंबाला हा मान दिला जातो. दोन कुटुंबाला मान दिल्या मुळे याचा फायदा खिल्लार बैलांना असा होतो कि, पहिल्या दिवशी एका कुटुंबाची बैल पालखी रथ ओढतात आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कुटुंबाची बैल रथ ओढतात, त्यामुळे पहिल्या दिवशीच्या बैलजोडीला एक दिवसाचा पूर्ण आराम मिळतो.

बैलजोडी निवडल्यानंतर दिला जातो विशेष व्यायाम

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा महिनाभराचा असतो. बैलांना सतत चालावं लागतं. रथ ओढावा लागतो.

बैलांना लोकांमध्ये, गर्दीत चालण्याची लोकांमध्ये चालण्याची सवय व्हावी यासाठी त्याला माणसांत नेलं जातं. तसेच, रथ ओढण्याची ताकद यावी यासाठी खुराक आणि त्यांचा व्यायाम त्यांना तो रोजच्या रोज करून घेतला जातो.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT