Benefits Of Tulsi Mala: Sakal
लाइफस्टाइल

Ashadhi Wari 2024: वारकऱ्याच्या गळ्यात असलेल्या तुळशीमाळेचं जाणून घ्या महत्व अन् आरोग्यदायी फायदे

Benefits Of Tulsi Mala: तुम्हालाही वारीत सहभागी व्हायचे असेल आणि तुळशीची माळ घालायची असेल तर त्याचे महत्व आणि नियम सोप्या शब्दांत समजून घ्या.

Puja Bonkile

Benefits Of Tulsi Mala: आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांची पालखी देहूमधून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यासाठी विविध ठिकाणांहून वारकरी आणि भक्त या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येतात. या वारकऱ्यांच्या गळ्यात तुळशीची माळ असते. ही माळ घालण्याचे नियम आणि महत्व काय आहे हे जाणून घेऊया.

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खुप महत्व आहे. अनेक लोकांच्या घरी तुळशीचे रोप असतात. मान्यतेनुसार घरासमोर तुळशीचे रोप असणे शुभ मानले जाते. शास्त्रानुसार या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो.

तुळशीमाळ घालण्याचे फायदे

तुळशीमाळ घातल्याने अनेक संकटांपासून मुक्ती मिळते.

धार्मिक महत्व असण्याबरोबरच याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत.

वास्तुनुसार तुळशीमाळ घातल्याने बुध आणि शुक्र ग्रह मजबूत होतात आणि मन शांत राहते.

तसेच मन शांत आणि आत्मा शुद्ध होते.

तुळशीमाळ गळ्यात घातल्याने अॅक्युप्रेशर पॉइंटवर दबाव आणला जातो, व मानसिक तणाव कमी होतो.

स्मरणशक्ती वाढविण्यात देखील तुळशीमाळ मदत करते.

तुळशीमाळेमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

कोणत्या नियमांचे पालन करावे

तुळशीमाळ घालण्यापुर्वी गंगाजलने धुवावी आणि सुकल्यानंतर घालावी.

तुळशी माळेचा रोज जप करावा.

यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतील.

तुळशीमाळ घातल्यावर सात्विक आहार घ्यावा.

कांदा, लसूण,मांस आणि इतर पदार्थांचे सेवन करणे टाळावे.

तुळशीमाळेचं महत्व

पौराणिक कथेनुसार तुळशीला वरदान आहे की भगवान विष्णू केवळ तुळशीची पाने अर्पण केलेले नैवेद्यच स्वीकारतात. जे लोक तुळशीमाळ घालतात त्यांना भगवान विष्णू आश्रयामध्ये घेतात आणि त्या लोकांना वैकुंठाची प्राप्ती होते.

तुळशीमाळ कशी ओळखाल?

तुळशीमाळ ओळखण्यासाठी अर्ध्या तासासाटी पाण्यात ठेवावे. जर त्याचा रंग निघाला तर समजून घ्या की ही एक बनावट माळ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: गड्या आपला गावच बरा! युद्धानंतर महागाईचा भडका, २० रुपयांचे पोहे ३५ रुपयांवर; विद्यार्थ्यांनी धरली गावची वाट

Petrol Diesel Prices India : मध्य पूर्वेतील तणावाचा तेलांच्या किमतीवर परिणाम ! जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

‘धुरंधर 2’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पण प्रकाश राज यांचा बॉलिवूडवर सवाल, 'हिंदी कलाकार गप्प का?'

Chhatrapati Sambhajinagar: पुण्यातील मेसवर गॅस टंचाईचा फटका; चुलीवर स्वयंपाक, मेन्यू बदलला.

Latest Marathi News Live Update : राजस्थानमधील भाजप खासदार राव राजेंद्र सिंह यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने

SCROLL FOR NEXT