Ashadhi Wari 2024 
लाइफस्टाइल

Ashadhi Wari 2024 : तुकोबारायांची सुद्धा वारी चुकली होती, तेव्हा त्यांनी काय केलं?

कपाळी अष्टगंध, डोक्‍यावर गुलाबी फेटा, खांद्यावर भागवत धर्माची पताका घेऊन "ज्ञानोबा - तुकोबा'च्या नावाचा जप करत अवघा वैष्णवांचा मेळा निघाला पंढरीला.

सकाळ डिजिटल टीम

कपाळी अष्टगंध, डोक्‍यावर गुलाबी फेटा, खांद्यावर भागवत धर्माची पताका घेऊन "ज्ञानोबा - तुकोबा'च्या नावाचा जप करत अवघा वैष्णवांचा मेळा निघाला पंढरीला. राज्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावल्याने पेरण्या उरकून लाखो वारकऱ्यांची पाऊले पंढरीच्या वारीसाठी वळली आहेत.

महाराष्ट्रातील अनेक घराणी आहेत, जी परंपरेने वारकरी आहेत. अगदी संत तुकाराम महाराज याचं घराणं… तुकाराम महाराज यांचे आठवे पूर्वज विश्‍वंभर बाबा हे वारकरी होते. ते संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांचे समकालीन होते.

म्हणून तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे की, पंढरीची वारी आहे माझे घरी । आणिक न करी तीर्थव्रत ॥वारी हाच त्यांचा कुळाचार आणि वारी हाच त्यांचा कुळधर्म…पण एकवेळ अशी येते की तुकाराम महाराज यांची वारी चुकते. तर तेव्हा त्यांनी काय केलं?

पंढरपूरच्या वारीची परंपरा तुकोबारायांच्या अनेक पिढ्यांमध्ये पूर्वीपासून सुरु होती. विश्वंभर बाबा हे या घराण्याचे मुळपुरुष. त्यांनीच विठ्ठल रखुमाई या स्वयंभू मूर्तीची स्थापना आपल्या वाड्यात केली. त्यांच्या पूर्वजांपासून चालू असलेली पंढरीची वारी तुकोबांनी दिंडी सोहळ्याच्या स्वरूपात त्यांचे चौदाशे टाळकरी आणि काही वारकऱ्यांच्या समवेत अखंड चालू ठेवली.

तुकाराम महाराज दर वद्य एकादशीला दिंडीसह वर्तमान आळंदीसही जात व कीर्तन करत. ती परंपरा अजूनही चालू आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी आळंदीला श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर बांधले, असा उल्लेख Bombay Presidency Volume-Part 3, Poona gazetteer 1885 Page 102 to 104 मध्ये केलेला आहे.

तुकोबा सर्वांसह मोठ्या सोहळ्याने निघत तुकोबांचा वारीचा नेम कधी चुकला नाही, पण एकदा ते वारीच्या वेळेला आजारी पडले. तशाही स्थितीत ते वारीला निघाले. पण पाऊल उचलेना, वारीला अंत पडल्याचे दुःख श्रीतुकोबांना अनिवार झाले. ते शोक करू लागले. वारीला जाण्याकरिता आलेल्या वारकऱ्यांबरोबर त्यांनी एक २४ अभंगांचे पत्र देवाला दिले.

नंतर वारकरी पंढरीहून वारी करून संत तुकाराम महाराजांच्या भेटीस आले, त्यांना भेटले. त्या वेळी त्यांना ब्रह्म ठेंगणे झाले. श्री तुकोबा वैकुंठाला जाईपर्यंत हा वारीचा सोहळा प्रतिवर्षी पार पाडीत असत. ते वैकुंठाला गेले त्यावेळी त्यांची मुले लहान होती. तेव्हा पंढरीच्या वारीची परंपरा तुकोबांचे धाकटे बंधू कान्होबा यांनी चालू ठेवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चाकणकर राज्यातल्या सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार, रुपाली ठोंबरेंचा आरोप; मुख्यमंत्री फडणवीसांचे केले अभिनंदन

Latest Marathi News Live Update : 'फरसा वाले बाबा' यांच्या मृत्यूनंतर, जखमी ट्रक चालकचाही मृत्यू

Maharashtra Transport News: इलेक्ट्रिक बस ठरताहेत तोट्याचा सौदा; एसटीची सरकारकडे मदतीची याचना

Kanthha Tamil Movie Review : सिनेमा दिग्दर्शकाचा असतो की सुपरस्टारचा?

Latur News: ‘नाटक-चित्रपट क्षेत्र मृगजळ’; मोहन जोशींचा नव्या पिढीला इशारा

SCROLL FOR NEXT