Astro Tips google
लाइफस्टाइल

Astro Tips : स्वप्नात ‘हा’ प्राणी दिसणे असते शुभ; नशीब होईल धन-धना-धन !

हत्ती हे ऐश्वर्य आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. हत्तीचे स्वप्न पाहणे खूप शुभ मानले जाते.

Pooja Karande-Kadam

पुणे : काहीवेळा भितीदायक तर काहीवेळा शुभ स्वप्न पडतात. या पडणाऱ्या स्वप्नांमागे विशिष्ट संकेत असतात. एखाद्या स्वप्नाचा ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून नेमका काय अर्थ असू शकतो, याचा शोध घेतला जातो. स्वप्नात काही प्राण्यांचे दिसणे अत्यंत शुभ मानले जाते. एक प्राणी स्वप्नात दिसल्याने लवकरच धनाची प्राप्ती होऊ शकते. अशी मान्यता आहे. कोणता प्राणी स्वप्नात दिसणे शुभ आहे याबद्दल जाणून घेऊयात..

हत्ती हा अतिशय बुद्धीमान, बलवान, बलाढ्य प्राणी मानला जातो. स्वप्नात गजदर्शन होणे म्हणजे निश्चित यामागे काहीतरी संकेत असतात, असे म्हटले जाते.

स्वप्नात हत्ती दिसणे शुभ मानले गेले आहे. जर तुम्हाला स्वप्नात हत्ती दिसला तर त्याचाही विशेष अर्थ आहे. हत्ती हे ऐश्वर्य आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. हत्तीचे स्वप्न पाहणे खूप शुभ मानले जाते.

हत्ती हे लक्ष्मीचे प्रतिक मानले जाते. स्वप्नात गज दर्शन होणे म्हणजे लक्ष्मी देवीची आपल्यावर कृपा असून, लवकरच मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती होऊ शकते, असा त्यामागील संकेत असल्याचे सांगण्यात येते.

स्वप्नात हत्ती पाहण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच मान सन्मान मिळेल. जर तुम्ही स्वप्नात स्वतःला हत्तीवर स्वार असलेले पाहीले तर याचा अर्थ तुमची लवकरच प्रगती होणार आहे.

ऐरावत हत्ती एखाद्या महान कार्याचे स्वरूप मानले जाते. एखाद्या मोठ्या यशामुळे समाजात तुमचा मान वाढेल. तसेच, तुमची संपत्ती वाढेल. स्वप्नात हत्तीचं जोडपं दिसल्यास दांपत्य जीवनात सुख येण्याचे संकेत आहे.

जर एखाद्या गर्भवती महिलेला तिच्या स्वप्नात हत्ती दिसला तर ते तिच्या होणाऱ्या बाळासाठी शुभ असते.

स्वप्नात डौलत चालणारा हत्ती दिसल्यास आपण लवकरच आपल्या सर्व समस्यांपासून मुक्त व्हाल. स्वप्नात हत्तींचा कळप पाहणे हे आर्थिक लाभ दर्शवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT