Astrology
Astrology sakal
लाइफस्टाइल

Astrology: दृष्ट काढताना पोळी किंवा भाकरीचा तुकडा का ओवाळून टाकतात?

सकाळ डिजिटल टीम

अनेकदा भरपूर मेहनत करुनही हवं ते यश मिळत नाही. अनेकदा हातातला पैसा टिकत नाही. कधी कधी तर सतत आरोग्याच्या समस्या दिसून येतात. अशात मग तोंडावर येतं की 'मला कुणाची दृष्ट लागली का?'

कुंडलीतील ग्रह स्थिती, भाग्य, कर्म किंवा दोष याचा थेट संबंध आपल्यासोबत होणाऱ्या चुकीच्या गोष्टींशी जोडला जातो.ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात अशा समस्यांवर अनेक उपाय दिलेले आहेत आज आम्ही त्यातलाच एक उपाय तुम्हाला सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (astrology why is a piece of roti or bhakri waved to protect from negative vibes read story)

वाईट दृष्ट लागू नये म्हणून जुन्या काळापासून पोळी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळला जायचा आणि आजही ओवाळला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, असं का केलं जातं? आणि याचा खरंच फरक पडतो का? चला तर सविस्तर जाणून घेणार आहोत.

दृष्ट काढताना पोळी किंवा भाकरीचा तुकडा का ओवाळला जातो?

ज्योतिषशास्त्रानुसार पोळी आणि भाकरीत नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद असते. त्यामुळे कुंडलीतील दोष दूर करण्यास ते मदत करतात म्हणून दृष्ट काढताना पोळी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळला जातो

भाकरीच्या किंवा पोळीच्या तुकड्याचा उपाय कसा करायचा?

1. जेवणाच्या ताटाचा देवाला नैवेद्य दाखवावा आणि त्या ताटात पोळी किंवा भाकर असणे गरजेचे आहे.

2. पोळी किंवा भाकरी दान केल्यानेही दोष दूर होतात.

३. पोळीला तूप लावून त्याचे चार समान तुकडे करा. त्यावर गूळ किंवा साखर लावा. एक तुकडा गायीला तर दुसरा श्वानाला, तिसरा कावळ्याला तर चौथा तुकडा एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा.

3. दररोज गायीला तुप साखर पोळीचा नैवद्या घाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT