Top Sedan Cars in India 2023
Top Sedan Cars in India 2023 Esakal
लाइफस्टाइल

Top Sedan Cars: भारतातील टॉप सेडान कार त्याही १० लाखांहून कमी किमतीत

Kirti Wadkar

Top Sedan Cars in India: स्वत:चं घर आणि त्यानंतर एक गाडी असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. दारात एक छोटीशी का होईना चार चाकी असावी यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असतो. तर गाडी घेत असताना अनेकजण आरामदायी प्रवासासाठी सेडान कारचा पर्याय निवडतात. Automobile News Top Ten Sedan cars in India Price Under Ten Lacks

भारतात दरवर्षी अनेक कारची मॉडेल लॉन्च होत असतात. अशात आपल्या बजेटमध्ये बसणारी मात्र चांगला परफॉर्मन्स देणारी कोणती गाडी Car घ्यावी, असा प्रश्न अनेकांना पडतो. यासाठीच आज आम्ही तुम्हाला १० लाखांपेक्षा कमी किमतीमधील काही बेस्ट सेडान कारचे Sedan Car पर्याय सांगणार आहोत. 

१. टाटा टिगोर- टाटाच्या सब कॉम्पेक्ट गांड्यापैकी एक पर्याय म्हणजे टाटा टिगोर Tata Tigor. ही एक ५ सिटर कार आहे.  या गाडीची किंमत ही ७ लाखांपासून ते ९.९७ लाखांपर्यंत आहे. वेरियंटनुसार किंमतीत तफावत पाहायला मिळते. XE, XM, XZ, आणि XZ+ या चार वेरिंयटमध्ये ही कार उपलब्ध आहे.

तर टाटाने या गाडीत  XZ, आणि XZ+ या वेरियंटमध्ये CNGचा पर्यायही दिला आहे. 1199 cc इंजीन क्षमता असेल्या या गाडीचे मॅनुअल & ऑटोमेटिक असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. गाडीची बूट स्पेस चांगली असून कॅबिन स्पेसही चांगली आहे. शिवाय खडबडीत रस्त्यांचा विचार करता गाडीचं सस्पेन्शन चांगलं असल्याने अशा रस्त्यांवरून टिगोर सहजपणे चालते. 

२. ह्युंदाई औरा- ह्युंदाई कंपनीने २०२३ यावर्षात Hyundai Aura Facelift हे नवं मॉडल ल़ॉन्च केलं आहे. या गाडीची किंमत ६.२९ ते ८.५७ (Ex showroom price) मध्ये वेरियंटनुसार आहे.

कंपनीच्या दाव्यानुसार ऑराच्या नव्या मॉडलचं इटेरियर पूर्वीच्या मॉडेलपेक्षा अधिक अॅडव्हान्स आहे. ऑराच्या बेसिक मॉडलमध्ये ४ एअर बॅग देण्यात आल्या आहेत तर टॉप मॉडेलमध्ये साईड एअर बॅग सहित एकूण ६ एअर बॅग देण्यात आल्या आहेत.

Hyundai Aura Facelift Safety. इतर सेफ्टी फिचर्समध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, व्हेइकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट, हिल स्टार्ट असिस्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, इमरजेंसी स्टॉप सिग्नल, रियर पार्किंग सेंसर आणि कैमरा तसंच हेडलॅम्प एस्कॉर्ट फंक्शन यांचा समावेश आहे.

नवीन Aura मध्ये १.२ लिटर ४ सिलेंडर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आलंय. जे 83PS पॉवर आणि 113.8Nm टॉर्क जनरेट करतं. तर CNG मोडमध्ये इंजिन 69PS पॉवर आणि 95.2Nm टॉर्क जनरेट करतं.

३.मारुती सुझुकी डिझायर- मारुत्या सगळ्यात जास्त सेल होणाऱ्या गाड्यांपैकी ही एक गाडी म्हणता येईल. या गाडीची किंमत ही वेरियंटनुसार ७ लाखांपासून ते १०.२१ लाख अशी आहे. यात LXi, VXi, ZXi आणि ZXi+ असे मॉडल आहेत.

मात्र ही गाडी फक्त पेट्रोल इंजिनमध्येच उपलब्ध आहे.तर कमर्शियल वापरासाठी म्हणजेच व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या डिझायर टूर मॉडेलमध्ये डिझेल इंजिनचा पर्याय उपलब्ध आहे.Maruti Suzuki Dzire डिझायरच्या काही खास फिचर्समध्ये पुश/स्टार्ट बटण, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, कीलेस एंट्री आणि मागील बाजूस असलेले एअरकॉन व्हेंट्स यांचा समावेश आहे.

४. होंडा अमेझ- होंडा अमेझ Honda Amaze ही तीन वेरियंटमध्ये उपलब्ध आहे. E, S, आणि VX. या कारची किंमत ७.८८ लाखांपासून १०.७७ लाख अशी आहे. अमेझला केवळ पेट्रोल इंजिन असून ही कार मॅन्युअल आणि CVT गिअरबॉक्स पर्यायांसह उपलब्ध आहे.

होंडा अमेझच्या खास फिचर्सबद्दल सांगायचं झालं तय यात ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल आणि पॅडल शिफ्टर्स यांचा समावेश आहे.

त्याचसोबत Apple CarPlay आणि Android Auto या दोन्हींना सपोर्ट करणारी 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट स्क्रीन, अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आण इंजिन स्टार्ट-स्पॉप ऑप्शन हे देखील काही खास फिचर्स आहेत. तसचं ड्युअल एअर बॅग, रिअर पार्किंग सेन्सर, सीट बेल्ट अलर्ट असे काही वेगवेगळे फिचर्स मॉडलनुसार पाहायला मिळतात. 

५. ह्युंदाई वरना- ह्युंदाई वरना ही एक प्रिमियम ५ सिटर कार आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या कारची बूट स्पेस चांगली असून सहा एअर बॅग देऊन सेफ्टी देण्यात आली आहे. या कारमध्ये ५ रंगांचा पर्याय उपलब्ध आहे. पेट्रोल गाडी १.५ लिटर क्षमतेचं इंजिन आहे. या गाडीची किंमत ही  ९.२० लाखांपासून १३ लाखांपर्यंत आहे. 

याशिवाय १० लाखांच्या आत जर तुम्ही  सेडान कार पाहत असाल तर टोयटा इटियोज ETIOS हा पर्यायही पाहू शकता. ही कार पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिनमध्ये उपलब्ध आहे. या कारची किंमत ही ६.३० ते ८.८० हजार अशी आहे. तसचं मारुती सुझुकी सियाझ Maruti Suzuki Ciaz ही देखील १० लाखांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेली एक सिडान कार आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar Hoarding Collapse: काळजात धडकी भरवतात ते १७ सेकंद; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा दुसरा VIDEO आला समोर

Shirur Lok Sabha : मतांचा टक्का घसरल्यामुळे भल्याभल्यांचे अंदाज चुकणार... शिरूरमध्ये घड्याळ चालणार की तुतारी वाजणार?

Indian Economy : भारत २०२५ पर्यंत चौथी अर्थव्यवस्था ; जी-२० शेर्पा व निती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांचा विश्वास

SAKAL Exclusive : संवेदनशील प्रकरणांत भाजपचे मौन धोकादायक; राष्ट्रीय काँग्रेसचे राज्याचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांचे मत

Lalu Yadav : जहानाबाद लोकसभेच्या जागेवरुन लालू यादवांचं टेन्शन वाढलं; आरजेडीच्या बंडखोराचा उमेदवारी अर्ज...

SCROLL FOR NEXT