Air Pollution  sakal
लाइफस्टाइल

Air Pollution : फटाकेच नाहीतर, अगरबत्ती अन् कॉईल जाळणे देखील टाळा, महाराष्ट्र सरकारचा सल्ला!

गेल्या काही दिवसात वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

Aishwarya Musale

राष्ट्रीय राजधानी आणि आजूबाजूच्या परिसरात वाढते प्रदूषणामुळे धोक्याची घंटा वाजली आहे. विषारी धुक्याच्या कहरामुळे दिल्ली-एनसीआरमधील सर्व भाग त्रस्त आहेत. विषारी धुक्याच्या वातावरणामुळे लोकांना श्वास घेणे कठीण झाले आहे.

घसा खवखवणे, डोळ्यात जळजळ होणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्या लोकांना भेडसावत आहेत. दिल्लीतील या वातावरणामुळे महाराष्ट्र राज्यातही प्रदूषणामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

वायू प्रदूषणाचे आरोग्यावर होणारे परिणाम टाळण्यासाठी जनजागृती करणे:

सामान्य नागरिक:-

  • वायू प्रदूषणाच्या संपर्कामुळे होणारा धोका खालील गोष्टींद्वारे कमी करता येणे शक्य आहे.

  • संथ आणि रहदारी असलेले रस्ते, प्रदूषण कारी उद्योगांजवळील क्षेत्रे, बांधकाम पाडण्याची ठिकाणे, कोळशावर आधारित अशी उच्च प्रदूषण असलेली ठिकाणे, टाळा वीज प्रकल्प व वीटभट्टी इत्यादी ठिकाणी जाणे टाळा.

  • एक्यूआय पातळीनुसार बाहेरील कामांचे वेळापत्रक तयार करा आणि खराब ते गंभीर एक्यूआय असलेल्या दिवसांमध्ये घरातच रहा.

  • खराब ते गंभीर एक्यूआय असलेल्या दिवसांमध्ये, सकाळी आणि संध्याकाळी उशिरा चालणे, धावणे, जॉगिंग आणि शारीरिक व्यायाम टाळा. • सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत खिडक्या आणि दरवाजे उघडू नका, गरज पडल्यास दुपारी

  • 12 ते दुपारी 4 या वेळेत बाहेर पडू शकता.

  • लाकूड, कोळसा, जनावरांचे शेण, रॉकेल यांसारखे बायोमास जाळणे टाळावे. स्वयंपाक आणि उष्णतेच्या उद्देशाने स्वच्छ धूररहित इंधन (गॅस किंवा वीज) वापरा. बायोमास वापरत असल्यास, स्वच्छ कुक स्टोव्ह वापरा.

  • फटाके जाळणे टाळा.

  • कोणत्याही प्रकारचे लाकूड, पाने, पिकांचे अवशेष आणि कचरा उघड्यावर जाळणे टाळा.

  • सिगारेट, बीडी आणि संबंधित तंबाखूजन्य पदार्थ सेवन नका करू.

  • बंद आवारात डासांच्या कॉईल आणि अगरबती जाळणे टाळावे.

  • घरांमध्ये झाडू मारण्याऐवजी किंवा व्हॅक्यूम साफ करण्याऐवजी ओल्या कपड्याचावापर करा. आपण व्हॅक्यूम क्लीनर वापरणे निवडल्यास, ज्यात उच्च कार्यक्षमता पार्टिकुलेट एअर (एचईपीए) फिल्टर आहे ते वापरा.

  • नियमितपणे वाहत्या पाण्याने डोळे धुत रहा आणि कोमट पाण्याने नियमित पणे गुळण्या करा.

  • श्वसनाचा त्रास, चक्कर येणे, खोकला, छातीत अस्वस्थता किंवा वेदना, डोळ्यांमध्ये जळजळ (लाल किंवा पाणी) असल्यास जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  • निरोगी आहार, अँटीऑक्सिडंट्ससमृद्ध फळे आणि भाज्या आणि पाणी पिऊन पुरेशा प्रमाणात शरीरामधील पाण्याची पातळी राहील याची काळजी घ्या.

ऐच्छिक उपाययोजनाः

डिस्पोजेबल एन 95 किंवा एन 99 मास्क वापरणे उपयुक्त आहे. प्रधुषणात कमी वेळ बाहेर जाणार असल्यास हे मास्क मदत करू शकतात. कागदी मास्क, रुमाल, स्कार्फ आणि कापड प्रभावी नाही. आपण एअर प्युरिफायर वापरणे निवडल्यास उत्पादकांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा.

निर्देशानुसार फिल्टर बदलण्याची आणि स्वच्छ करण्याची खात्री करा. ओझोन निर्माण करून काम करणारे एअर प्युरिफायर वापरणे टाळा, कारण यामुळे खोल्यांमधील प्रदूषण वाढते. इमारती किंवा वाहनात एअर कंडिशनर चालवताना, बाहेरील हवेशी संपर्क टाळण्यासाठी "री सर्क्युलेट" मोडमध्ये वापरा,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

Illegal Sand Mining: सुखना नदीतून वाळू उपसा करणारे जेरबंद; पाचजणांवर गुन्हा; पाच ट्रॅक्टरसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

Manmad News : इंदूर-पुणे महामार्गावर कंटेनर अपघात; मनमाडजवळ वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Updates : पालकमंत्री अतुल सावे यांची गाडी गावकऱ्यांनी अडवली

SCROLL FOR NEXT