tea sakal
लाइफस्टाइल

Health Tips: सकाळी रिकाम्या पोटी हे 3 पदार्थ खाणे टाळा, बिघडू शकते तब्येत

तुम्ही रिकाम्या पोटी काय खात आहात हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे.

Aishwarya Musale

ब्रेकफास्ट हे तुमच्या संपूर्ण दिवसातील सर्वात महत्वाचे जेवण आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, नाश्ता केल्याने तुम्हाला दिवसभर उत्साही वाटते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही रिकाम्या पोटी काय खात आहात हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे कारण त्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण शरीरावर दिसून येतो. अनेक लोक आहेत ज्यांना नाश्त्यात जड पदार्थ खायला आवडतात, तर बरेच लोक आहेत ज्यांना हलके अन्न आवडते.

लिंबूपाणी मध्ये मध

अनेक लोक सकाळी लिंबूपाणीमध्ये मध मिसळून पितात. आजकाल हे एक सामान्य ड्रिंक बनले आहे. लोकांचा असा विश्वास आहे की ते चरबी जाळण्यास मदत करते. आरोग्य तज्ञांनी सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी मध मिसळून पिऊ नये असा सल्ला दिला आहे.

ते म्हणतात की मधामध्ये जास्त कॅलरीज असतात आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स साखरेपेक्षा जास्त असतो. काही पोषणतज्ञ त्यास चुकीचे म्हणतात.

चहा किंवा कॉफी

तुम्हीही सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पीत असाल तर आता असे करू नका. सकाळी काहीही न खाता चहा किंवा कॉफी प्यायल्याने पोटातील अॅसिडचे प्रमाण वाढू शकते. चहा, कॉफी किंवा इतर कॅफिनयुक्त पेये स्ट्रेस हार्मोन्स वाढवू शकतात.

फळ

वेलनेस एक्स्पर्ट नेहा सहायने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले आहे की, सकाळी रिकाम्या पोटी फळेही खाऊ नयेत. इतर पदार्थांच्या तुलनेत फळे लवकर पचतात. यामुळे तासाभरात भूक लागते. काही लिंबूवर्गीय फळे रिकाम्या पोटी खाल्ल्यानेही अॅसिडिटी होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT