Child Care Tips
Child Care Tips Sakal
लाइफस्टाइल

Summer Care: उन्हाळ्यात लहान मुलांना एसी अन् कुलरमध्ये झोपवत असाल तर या गोष्टींची घ्या काळजी

पुजा बोनकिले

avoid these things while child sleeping in ac or cooler

एप्रिल महिना सुरू होताच उष्णतेच्या तीव्र झळा जाणवत आहेत. उन्हाचा त्रास सर्वांनाच होत आहे. उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी प्रत्येकाला कूलर किंवा एसीमध्ये राहायचे आवडते. एसी किंवा कूलरची हवा तुम्हाला बऱ्याच अंशी थंडावा देते. पण ही हवा नवजात किंवा लहान मुलांसाठी सुरक्षित आहे का? या प्रश्नामुळे पालक अनेकदा चिंतेत असतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते मुलांना एसी किंवा कुलरच्या हवेत झोपवू शकता. परंतु काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. मुलांना एसी किंवा कुलरमध्ये झोपवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.

कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी

  • जर तुम्ही तुमच्या मुलाला एसी किंवा कुलरमध्ये झोपवत असाल तर नेहमी लक्षात ठेवा की थेट हवा तुमच्या मुलांना लागू नये. मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते, त्यामुळे अगदी थंडीतही तुमच्या बाळाला सर्दी आणि ताप येऊ शकतो. यामुळे मुलाच्या शरीराचे तापमान तपासत राहावे.

  • जर तुम्ही मुलाला एसी असलेल्या रूममधून दुसऱ्या रूममध्ये हलवत असाल तर लगेच करू नका. आधी एसी बंद करा आणि शरीराला खोलीच्या तापमानावर आणा. त्यानंतरच मुलांना दुसऱ्या रूममध्ये घेऊन जावे.

  • मुलाला जास्तवेळ थंड तापमानात ठेवू नका. यामुळे शरीराचे तापमान कमी होण्याचा धोका असू शकतो. जर तुम्ही मुलांना एसी रूममध्ये झोपवत असाल तर एसीचे तापमान 23 ते 26 च्या दरम्यान ठेवा. यापेक्षा कमी तापमान असल्यास मूल आजारी पडू शकतात.

  • तुम्ही मुलांना एसी किंवा कूलरमध्ये झोपवत असाल तरी त्यांच्या अंगावर पांघरून ठेवावे. थंडीमुळे तो थरथरत आहे का हे पाहण्यासाठी वेळोवेळी बाळाची तपासणी करत रहावी.

  • मुलांना एसीमध्ये झोपवत असाल तर त्वचेचा कोरडेपणा वाढू शकतो. यामुळे त्वचेचे आजार होऊ शकतात. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार तुम्ही तुमच्या बाळाला वेळोवेळी मॉइश्चरायझर लावावे. तसेच मुलांना स्तनपान करत राहावे. यामुळे मुले हायड्रेट राहतात.

  • त्याच वेळी, जर तुमचे मूल आजारी असेल किंवा प्री-मॅच्युअर असेल, तर त्याला एसी किंवा कुलरध्ये झोपवण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''तब्येत खराब आहे तर प्रचार का करता?'', भर कोर्टात ED ने केजरीवालांना केला सवाल, म्हणाले...

T20 World Cup 2024 : आयसीसीनं स्पर्धेतील प्रमुख संघाची जर्सी केली बॅन! टी20 वर्ल्डकपला वादाची किनार?

Israel on All eyes on Rafah : 7 ऑक्टोबरला तुमचे डोळे फुटलेले का? इस्रायलचे 'त्या' व्हायरल फोटोला प्रत्युत्तर

Pune Porsche Accident: कारच्या फिचरमुळं सापडला कल्याणीनगर अपघातातला अल्पवयीन आरोपी नाहीतर...; प्रत्यक्षदर्शीने सांगितली हकीकत

Amruta Khanvilkar: मराठमोळी अमृता खानविलकर झळकणार हिंदी वेब सीरिजमध्ये; '36 डे ' चा ट्रेलर पाहिलात का?

SCROLL FOR NEXT