Ayurvedic Herbs esakal
लाइफस्टाइल

Ayurvedic Herbs : 'या' औषधी वनस्पतींच्या मदतीने चेहऱ्याची सैल त्वचा करा घट्ट, महागड्या क्रीम्सची गरज नाही भासणार

Skin Care Tips : आपले वय जसजसे वाढते तसे त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर आणि त्वचेवर दिसून येतो. साधारणपणे असे दिसून येते की, वाढत्या वयामध्ये त्वचेची लवचिकता ही कमी होऊ लागते.

Monika Lonkar –Kumbhar

Ayurvedic Herbs : आपले वय जसजसे वाढते तसे त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर आणि त्वचेवर दिसून येतो. साधारणपणे असे दिसून येते की, वाढत्या वयामध्ये त्वचेची लवचिकता ही कमी होऊ लागते. त्यामुळे, त्वचा दिवसेंदिवस सैल दिसू लागते. जेव्हा, आपल्य चेहऱ्यावरील त्वचा ही सैल होऊ लागते,तेव्हा त्वचेवर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसू लागतात.

अशा परिस्थितीमध्ये मग, अनेक महिला विविध प्रकारच्या स्किनकेअर प्रॉडक्टसचा वापर करताना दिसतात. मात्र, त्यामुळे, तात्पुरता फरक दिसून येतो. या स्किनकेअर प्रॉडक्ट्समध्ये केमिकल्सचे प्रमाण जास्त असते.

हे केमिकल्स त्वचेसाठी घातक ठरू शकतात. चेहऱ्याची त्वचा घट्ट करण्यासाठी तुम्ही काही औषधी वनस्पतींची मदत घेऊ शकता. त्यांचा वापर केल्याने तुमची त्वचा घट्ट होण्यास मदत होईल. कोणत्या आहेत या वनस्पती? चला तर मग जाणून घेऊयात.  

रोझमेरी

चेहऱ्यावरील त्वचा नैसर्गिकरित्या घट्ट करायची असेल तर, रोझमेरीचा वापर केला जाऊ शकतो. रोझमेरी ही आपल्या त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. रोझमेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे भरपूर प्रमाण आढळून येते, त्यामुळे, त्वचा घट्ट होण्यास मदत होते. रोझमेरीचा वापर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईलसारख्या तेलामध्ये रोझमेरीची पाने बुडवा. आता तुमचे रोझमेरी तेल तयार आहे. या तेलाचा तुमच्या स्किनकेअर रूटीनमध्ये अवश्य समावेश करा.

जिनसेंग

जिनसेंग या औषधी वनस्पतीचा वापर खास करून त्वचेसाठी केला जातो. जिनसेंगमुळे त्वचेची लवचिकता सुधारण्यास मदत होते. यासोबतच जिनसेंगचा वापर करून आपण स्किन टोनर देखील बनवू शकतो आणि त्याचा स्किनकेअर रूटीनमध्ये समावेश करू शकतो. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या स्किनकेअर रूटीनमध्ये जिनसेंगचा अर्क समाविष्ट करू शकता.

आवळा

आपल्या आरोग्यासाठी त्वचेसाठी आणि केसांसाठी आवळा अतिशय फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स आणि इतर पोषकघटकांचा समावेश असतो. ज्यामुळे, तुमची त्वचा नैसर्गिकरित्या घट्ट होते. शिवाय, त्वचेतील कोलेजन उत्पादनास चालना देण्यासाठी आणि त्वचेची लवचिकता सुधारण्यासाठी आवळा मदत करते.

आवळ्याचा फेसमास्क बनवण्यासाठी एक चमचा आवळा पावडर घ्या. त्यामध्ये, १ चमचा मध आणि एक चमचा दही मिसळा. आता तुमचा फेसमास्क तयार आहे. १५-२० मिनिटे हा फेसमास्क चेहऱ्यावर लावा. त्यानंतर, चेहरा कोमट पाण्याने धुवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT