elephant esakal
लाइफस्टाइल

...शेवटी 'ती' आईचं! हा व्हिडीओ नक्की पाहा

व्हिडीओ होतोय व्हायरल

सकाऴ वृत्तसेवा

आई हत्तीण आणि तिचे बाळ यांच्यातील प्रेम दाखवणारा हा व्हिडिओ हेच सिद्ध करतो.

आई या एका शब्दात पूर्ण जग सामावलंय. एक आई आपल्या मुलासाठी जे काही करु शकते ते कुणीच करु शकत नाही. कदाचित देवही नाही. आईचे प्रेम आणि माया या दोन्ही गोष्टी मानवी आणि प्राणी दोघांसाठी सारख्याच असतात. म्हणजेच आईचं काळीज सारखंच असतं. त्यांचा भेद करता येत नाही. आई हत्तीण आणि तिचे बाळ यांच्यातील प्रेम दाखवणारा हा व्हिडिओ हेच सिद्ध करतोय. ट्विटरवर शेअर केलेल्या या क्लिपमध्ये हत्तीणींच एक लहान पिल्लू दाखवण्यात आलं आहे, जे टायरच्या स्विंगमध्ये अडकलं होतं आणि त्याला बाहेर पडता येत नाहियेय पण नंतर त्या पिल्लाची आई तिथं आली आणि नंतर तिने जे काही केलं ते पाहून तुमच्या चेहऱ्यावर समाधानाची छटा उमटल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे .

व्हिडीयो मध्ये दिसतंय की, एका मोकळ्या जागेत हत्तीणींच पिल्लू खेळत होते. खेळता खेळता पिल्लाचा पुढचा उजवा पाय अचानक तिथं अडकवलेल्या टायर स्विंगमध्ये अडकलेला दिसतो. पिल्लू त्यातून बाहेर पडायचं प्रयत्न करते पण त्याला त्यातून बाहेर पडता नाही. काही क्षणांच्या धडपडीनंतर त्याची आई आपल्या बाळाकडे धाव घेते. थोड्या प्रयत्नांनंतर ती यशस्वीरित्या बाळाचा पाय टायरमधून बाहेर काढते. आणि त्याची सुटका करते. या व्हिडिओमधील आईची आपल्या पिल्लासाठीची धडपड व्हिडीयोला खास बनवलं आहे.

हा व्हिडीओ ९००० हून अधिक लोकांनी पाहिला असून त्यावर अनेक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं आहे की, आई हत्तीणीचे वर्तन पूर्णपणे मानवी आईसारखेच आहे. आपल्या बाळाचं रक्षण करण्यासाठी एक माता काहीही करू शकते अशीही कमेंट एका युजर्सने दिली आहे. अशा आणखी खूप कमेंट्स युजर्संनी दिल्या आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून या खऱ्या आईला पाहून माँ तुझे सलाम असेच म्हणावसं वाटतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Devang Dave: कोण आहेत देवांग दवे? विजय वडेट्टीवारांनी काय आरोप केले? निवडणूकीपूर्वी भाजप अडचणीत येणार?

Wai Voter list: 'वाईतील प्रारूप मतदार यादीत गंभीर चुका'; काँग्रेससह भाजप, राष्ट्रवादी पक्षाने घेतली हरकत..

खुनशी हसू आणि थरार ! आम्ही दोघीनंतर प्रिया-मुक्ताचा नवा सिनेमा; पोस्टर चर्चेत

Uddhav Thackeray : 'इलेक्शन ऐवजी थेट सिलेक्शन करा'! निवडणूक आयोगाने घातलेल्या गोंधळावर उद्धव ठाकरे वैतागले

Man With 1638 Credit Cards: बापरे! या माणसाकडे आहेत तब्बल 1,638 क्रेडिट कार्ड्स; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झालीये नोंद!

SCROLL FOR NEXT