Parents esakal
लाइफस्टाइल

Baby Names : कधीही जुनी न होणारी लहान मुला-मुलींची नावं

आपल्या मुलाचं नाव सर्वात वेगळं आणि गोड असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं.

सकाळ डिजिटल टीम

आपल्या मुलाचं नाव सर्वात वेगळं आणि गोड असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं.

आपल्या घरी एखादं बाळ जन्माला येणार असल्याची बातमी समजताच घर आनंदी होवून जातं. सगळेजण त्याच्या येण्याची वाट पाहतात. यावेळी बाळ (Baby) जन्माला येण्याआधीच आई-वडील (Parents) त्याच्या नावाचा विचार करू लागतात. मुलाच्या जन्मानंतर कुटुंबातील सदस्य, अगदी मित्रमैत्रिणीसुद्धा या कामात गुंतून जातात. आपल्या मुलाचं नाव सर्वात वेगळं आणि गोड असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. मुलाच्या नावाचा त्याच्यावर मोठा प्रभाव पडतो, असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर हिंदू कुटुंबांमध्ये राशीनुसार जे अक्षर निघते, त्यावरुनच नाव ठेवले जाते. अशा परिस्थितीत उत्तम नाव शोधणे म्हणजे अवघड काम. मुलांची चांगली नावं (Baby Names) निवडताना काही गोष्टीही लक्षात ठेवायला हव्यात.

नामकरण करताना लक्षात ठेवा:

अशावेळी अनेकांचं मत असते की, इतरांच्या दृष्टीने तुमचं नाव हे आपल्याबद्दलचं पहिलं इम्प्रेशन असतं. या नावाचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतो की नाही यावर बरेच संशोधन आहे. जेव्हा तुमच्या घरात मूल जन्माला येईल, तेव्हा त्याचे नामकरण करताना काय लक्षात ठेवावे. सर्वप्रथम ट्रेंडी नावांच्या मागे लागू नका. कारण एका विशिष्ट वेळी ही नावे प्रसिद्ध असतात आणि अनेक मुलांची नावे एकसारखेच होतात. काही काळानंतर ही नावं आऊट ऑफ ट्रेंड होतात.

मुलींची खास नावे:

हिंदू नावांबद्दल बोलायचे झाले तर आजकाल प्रचलित अशी नावे आहेत ज्यांचे पौराणिक संबंध आहेत. ही अशी नावे आहेत जी कधीच जुनी होणार नाहीत. मुलींबद्दल बोलायचे झाले तर सिया (सिया), जानकी, वैदेही, तारा, अवनी (पृथ्वी), धारिणी (पृथ्वी), सान्वी, सानवी (लक्ष्मी), शनाया (सूर्याचा पहिला किरण), मिशा (जो आयुष्यभर सुखी राहील, देवाचा मेसेज), गार्गी (देवी दुर्गा), दृष्टी, तुलिका, संस्कृती, सुरमई, मृगांका.

मुलांची नावे:

त्याचबरोबर प्रभास (चमकदार), अद्विक (सर्वात वेगळा), एकांश (परफेक्ट) अशी हिंदी मुलांची नावे आहेत. दर्शन (दृष्टी), त्रिजल (शिव), रेडान किंवा हृदान (ज्याचे हृदय खूप चांगले आहे), संस्कार, सम्यक, तुहीन (बर्फ), निहाल (आनंदी किंवा यशस्वी), शशा (चंद्र), मीत (मित्र), पार्थ (अर्जुन), मृगांक (चंद्र), पार्थसारथी (कृष्ण) असे नावं ठेवता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : ऐन दिवाळीत थंडी गायब, 'ऑक्टोबर हिट' चा चटका वाढला, आज राज्यातील 'या' भागांत पावसाचा इशारा

Devgad Hapus Mango : फळांचा राजा आला बाजारात; दिवाळीत 'देवगड' हापूसची पहिली पेटी वाशी मार्केटमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update : परवानगीसाठी प्रशासनाकडे आता तगादा लावणार नाही; काळा दिन फेरी काढण्‍याचा समितीचा निर्धार

Panchang 21 October 2025: आजच्या दिवशी तीळ किंवा आवळकाठी चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे

MLA Rohit Pawar: सरकारला तुकोबांनी सुबुद्धी द्यावी : आमदार रोहित पवार; संजय शिरसाट यांच्याबाबत नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT