Bananas for Hair Growth sakal
लाइफस्टाइल

Bananas for Hair Growth: लांब केस हवेत? मग केळीच्या सालीचा असा वापर करून पाहा

लांब आणि सुंदर केस प्रत्येकालाच हवे असतात.आज आम्ही तुमच्यासाठी केळीच्या सालीचं पाणी घेऊन आलो आहोत.

Aishwarya Musale

Bananas for Hair Growth: प्रत्येक महिलेचं स्वप्न असतं की तिचे केस लांब आणि सुंदर असावेत. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी केळीच्या सालीचे पाणी घेऊन आलो आहोत. कॅटेचिनसारख्या अँटीऑक्सिडंट्स केळीमध्ये भरपूर प्रमाणात असतात.

हे तुमच्या केसांच्या पेशींचे नुकसान टाळण्यास मदत करते. तुम्ही केसांना सालीचे पाणी लावल्याने अकाली पांढरे होणे, केस पातळ होणे, कोरडेपणा आणि दुहेरी केस टाळण्यास मदत होते.

एवढंच नाही तर केसांना सालीचं पाणी लावल्याने चमक देखील येते. तसेच अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आहेत, जे तुमच्या केसांना इन्फेक्शन आणि बॅक्टेरियाशी लढण्यास देखील मदत करतात.

केळीच्या सालीचा वापर केल्याने कोंडा, चिडचिड आणि खाज सुटणे यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया केळीच्या सालीचे पाणी कसे बनवावे.

केळीच्या सालीचं पाणी बनविण्यासाठी लागणारे साहित्य

  • केळीची 2 साल

  • 3 कप पाणी

केळीच्या सालीचं पाणी कसे बनवावे?

  • सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हे पाणी बनवण्यासाठी १ कढई घ्यावी.

  • त्यामध्ये पाणी घालून अर्धे होईपर्यंत उकळावे.

  • नंतर गॅस बंद करून थोडं पाणी कोमट होऊ द्यावे.

  • त्यानंतर त्यामध्ये २ केळीचे साल घालून रात्रभर भिजवून ठेवावे.

  • नंतर हे सालीचं पाणी सकाळी एकदा मिसळून स्प्रे बाटलीत भरून घ्यावे.

Bananas for Hair Growth

केळीच्या सालीचं पाणी केसांना असे लावावे?

  • तुम्ही केसांमध्ये केळीच्या सालीचे पाणी कंडिशनर म्हणून देखील लावू शकता.

  • त्यांनतर माइल्ड शॅम्पूच्या मदतीने केस धुवा.

  • तुम्ही यांनतर केसांचे अतिरिक्त पाणी पिळून घ्या आणि बनवलेले सालाचे पाणी लावा.

  • त्यांनतर हे सालीचे पाणी केसांमध्ये २० मिनिटे राहू द्या.

  • ते झाल्यावर नॉर्मल पाण्याने केस धुवून स्वच्छ करावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT