Celebrity Hair Care Tips Sakal
लाइफस्टाइल

Celebrity Hair Care Tips : अभिनेत्री भाग्यश्री केसांसाठी या 2 तेलांचा करते वापर, जाणून घ्या तेलाचं नाव-फायदे

अभिनेत्री भाग्यश्री आपल्या केसांची निगा राखण्यासाठी कोणत्या तेलाचा वापर करते, याबाबत माहिती देणारा व्हिडीओ स्वतः तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. चला तर जाणून घेऊया औषधी तेलांची माहिती...

सकाळ डिजिटल टीम

Hair Care Tips : “मैंने प्यार किया” फेम अभिनेत्री भाग्यश्री आपल्या अभिनयासह सौंदर्यासाठी चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. भाग्यश्री स्वतःच्या फिटनेसशी संबंधित काही टिप्स इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.

नुकतेच तिनं हेअर केअरशी संबंधित टिप्स सांगणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत तिनं आपल्या मजबूत व सुंदर केसांचे रहस्य शेअर केले आहे. चला तर जाणून घेऊया भाग्यश्री आपल्या केसांसाठी कोणत्या तेलाचा वापर करते.

भाग्यश्रीनं दिल्या हेअर केअर टिप्स 

भाग्यश्रीने सांगितले की केसांची निगा राखण्यासाठी ती नारळ व बदामाच्या तेलाचा वापर करते.  कारण या तेलांमधील पोषक तत्त्वांमुळे केस मुळासह मजबूत होतात आणि केसांवरील चमक टिकून राहते.  

बदाम आणि नारळाच्या तेलातील पोषकतत्त्व  

नारळाचे तेल आणि बदामाच्या तेलामध्ये हेल्दी फॅट्स, अँटी-फंगल, अँटी- ऑक्सिडंट्स, अँटी- बॅक्टेरिअल आणि अँटी- व्हायरल यासारखे गुणधर्म आहेत. तसंच या तेलामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई यासारखे पोषकतत्त्वांचीही मात्रा अधिक आहे.

त्यामुळे या दोन्ही तेलांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास केसांना भरपूर फायदे मिळतील. तसेच केसांना नैसर्गिक स्वरुपात मॉइश्चराइझर देखील मिळेल. ज्यामुळे कोरड्या केसांची समस्या दूर होण्यास मदत मिळेल.  

केसांसाठी हे तेल देखील वापरून पाहा

नारळाच्या तेलामध्ये कलोंजीच्या बिया मिक्स करून आपण केसांसाठी या तेलाचा वापर करू शकता. केसांशी संबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी हे तेल फायदेशीर ठरू शकते. मोहरीच्या तेलातही कलोंजीच्या बिया गरम करून आपण केसांसाठी या तेलाचा वापर करू शकता. हे तेल केसांच्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. 

नारळाचे तेल आणि मेथीच्या बिया

नारळाच्या तेलामध्ये मेथीच्या बिया मिक्स करून तेल मंद आचेवर गरम करा. यानंतर तेल थंड करून गाळून घ्या व हलक्या हाताने केसांचा मसाज करावा. या तेलाचा आठवड्यातून दोनदा वापर केल्यास केस मजबूत होतील, केसांमधील कोंडा कमी होईल. तसेच केसांवर चमक देखील वाढेल.   

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

SCROLL FOR NEXT