shehnaz gill
shehnaz gill esakal
लाइफस्टाइल

Beauty Tips : शेहनाजच्या चेहऱ्यावर कधीच येत नाहीत पिंपल्स ; वाचा तिचे ब्यूटी टिप्स

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अनेक तरूण-तरूणींना चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचा त्रास होतो. त्यामुळे विविध उपाय करून पिंपल्स कमी होतात. पण, काही काळ लोटला की पुन्हा चेहरा पिंपल्सने भरतो. या अशा उपायांनी स्कीन प्रोब्लेम कमी होण्याऐवजी जास्तच वाढतात. त्यामुळे जिचा चेहरा पिंपल्स विरहीत आहे अशी, अभिनेत्री शेहनाज गिलकडून घेऊया खास टीप्स...

ग्लॅमरस अभिनेत्री शेहनाज गिल आज तिचा २९ वा वाढदिवस साजरा करत आहे. टी.व्ही सिरीअलमधून पदार्पण केलेली शहनाज बिग-बॉसच्या १३ व्या सिझनमध्ये प्रसिद्धीझोतात आली. एका शोमध्ये शहनाज आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांची जोडी चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. शहनाज नेहमीच लुक्स आणि स्कीनची काळजी घेते.

मेकअप किंवा नो मेकअप लूक या दोन्हीमध्ये शहनाज सुंदर दिसते. तिच्या ग्लोइंग त्वचेमागे तिची मेहनत आहे. तिने वेटलॉस केले असून आताचे तिचे रूप अधिकच खुलले आहे. शहनाज गिलच्या सौंदर्याचे रहस्य काय आहे. ती त्वचेची नक्की कशी काळजी घेते ते जाणून घेऊयात तिच्याचकडून...

ग्लोइंग स्कीनसाठी करा हे काम

मेकअपने प्रत्येकजण सुंदर दिसतो. पण, पाणी ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला आतून सुंदर बनवते,असे शहनाज सांगते. तुमच्या लाइफस्टाइलमध्ये तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्या. ते त्वचेला आतून पोषण देते. आहारात ज्युस, ताक अशा द्रव पदार्थांचा जास्त वापर करा.

हेल्दी डायट

बिग बॉसनंतर शहनाजचे वजन खूपच वाढले होते. त्यामुळे हेल्दी डायट करून तिने वजन कमी केले. पण, तिचे ट्रांसफॉर्मेशन पाहुन चाहत्यांनाही धक्का बसला होता. वजन कमी करण्यासाठी तिने फक्त हेल्दी डाएट फॉलो केले. फास्टफुड खाणे बंद केले. फळे आणि सॅलेड यासारख्या गोष्टींचा आहारात समावेश केला.

‘मी पिंपल्सला घाबरते’

शहनाजला पिंपल्सची खूप भीती वाटते. त्यामुळे ती सॅलिसिलिक ऍसिड असलेले अनेक प्रोडक्ट वापरते. सर्वप्रथम चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवून त्यावर सीरम लावते. चेहऱ्यावर व्हिटॅमिन सी सीरम वापरण्याचा सल्ला शहनाज चाहत्यांना देते. जे प्रोडक्ट स्कीनसाठी चांगले आहेत तेच वापरा असे शहनाज म्हणते.

मेकअपच्या आधी लावा मॉइस्चराइजर

शहनाज मेकअप करण्याच्या आधी मॉइस्चराइजर आणि सनस्क्रीन लावण्याचा सल्ला देते. धुळ, माती यामुळे आपली त्वचा कोरडी पडते त्यामुळे त्यावर मॉइस्चराइजर लावणे फायदेशीर ठरते. मेकअप लाँग लास्टींग ठेवण्यात मॉइस्चराइजर मदत करते. ती स्वत तिच्या सोशल मिडीया अकाउंटवरून चाहत्यांना टीप्स देत असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक! CSK च्या विजयाने Points Tableचे बदलले गणित; मुंबईवर टांगती तलवार

Addiction in Teens : व्यसनांचा पाश अन् प्रकृतीचा विनाश.. पालकांनो, मुलांकडे लक्ष आहे का?

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

SCROLL FOR NEXT