Beauty Tips esakal
लाइफस्टाइल

Beauty Tips : चेहऱ्याला Bleach करताय? सावधान, जळू शकते त्वचा

चेहऱ्यावर ब्लीच केल्याबरोबर चेहऱ्यावर चमक येते. पण बऱ्याचदा असं होतं की, लोक चुकीच्या पध्दतीने ब्लीच करतात. त्यामुळे त्वचेला फायद्याऐवजी नुकसानच होतं.

सकाळ डिजिटल टीम

Right Way to Bleach Your Face : चेहरा स्वच्छ करायचा असो किंवा फेशियल हेअर लपवण्यासाठी बऱ्याच महिला ब्लीचचा वापर करतात. पार्लरमध्ये एक्सपर्ट्स आपल्या अनुभवातून याचा योग्य वापर करतात. पण याचा खर्च जास्त येत असल्याने काही महिला बाजारातून हे किट आणून स्वतःच करतात.

पण जर त्याचं प्रमाण आणि पध्दत चुकली तर चेहऱ्याची स्कीन जळून डाग पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे घरच्या घरी ब्लीच करण्याची योग्य पध्दत जाणून घ्या.

चेहरा स्वच्छ करणे

चेहऱ्यावर कोणतेही प्रॉडक्ट लावण्याआधी चेहरा स्वच्छ धुवून घेणं आवश्यक असतं. यासाठी चेहरा माइल्ड फेस वॉश लावून थंड पाण्याने धुवून घ्यावा.

ब्लीच क्रीम लावा

ब्लीच आपल्या पूर्ण चेहऱ्यावर केस वाढण्याच्या दिशेने लावा. कपाळ, गाल आणि मानेवर जाड लेयर लावावी. डोळ्यांच्या खाली आणि नाकाचा जवळ लावण्याचं टाळावं. ओठांच्यावर याचा पातळ लेयर लावावा. हे १५ मीनिटांसाठी ठेवावं.

त्वचेला आराम द्या

ब्लीच नंतर त्वचेला आराम देणं गरजेचं आहे. यासाठी एखादा सुदिंग फेसपॅक वापरा. त्यामुळे तुमच्या त्वचेची आग शांत होईल. तुम्ही घरीपण फेस पॅक बनवू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT