Homemade Herbal Shampoo Sakal
लाइफस्टाइल

Homemade Herbal Shampoo : घरच्या घरी तयार करा हर्बल शॅम्पू, केस होतील काळेभोर-घनदाट

Homemade Herbal Shampoo केसांचा पोत चांगला राहावा, यासाठी घरच्या घरी हर्बल शॅम्पू कसा तयार करावा? याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Herbal Shampoo Tips : कोळेभोर, लांबसडक आणि मऊ केस हवे असल्यास शक्य तितक्या लवकर हेअर केअर रूटीनमध्ये केमिकलयुक्त प्रोडक्ट्स वापरणं थांबवा. याऐवजी हर्बल शॅम्पू वापरण्यास सुरुवात करा.

यातील पोषण तत्त्वांमुळे केसांचा पोत सुधारेल आणि लहान वयात पांढऱ्या होणाऱ्या केसांची समस्या देखील नियंत्रणात येईल. चला तर मग जाणून घेऊया घरच्या घरी नॅचरल शॅम्पू कसा तयार करावा. 

हर्बल शॅम्पू तयार करण्यासाठी लागणारी सामग्री

  • भृंगराज पावडर - दोन चमचे

  • शिकेकाई पावडर - दोन चमचे

  • रीठा पावडर - दोन चमचे

  • जास्वंद फुलाची पावडर - दोन चमचे

  • आवळा पावडर - दोन चमचे

  • मुलतानी मातीचा एक तुकडा

  • पाणी - दोन मोठे कप

  • अळशीच्या बिया - एक चमचा

  • मेथीच्या बिया - एक चमचा

शॅम्पू तयार करण्याची पद्धत 

  • सर्वप्रथम वरील सर्व पावडर एका भांड्यामध्ये एकत्रित करा आणि त्यामध्ये दोन कप पाणी देखील मिक्स करा.

  • यानंतर हे मिश्रण पाच ते सहा तास झाकून ठेवा. 

  • एका सुती कापडाच्या मदतीने वरील सर्व मिश्रण दुसऱ्या भांड्यामध्ये गाळावे. 

  • हे पाणी एक भांड्यामध्ये व्यवस्थित ठेवून द्या.

  • आता गॅसवर एक पॅन ठेवा आणि त्यामध्ये एक कप पाणी ओतावे.

  • त्यामध्ये मेथी व अळशीच्या बिया देखील उकळून घ्या.  

  • जेव्हा पाण्याचे रूपांतर जेलमध्ये होण्यास सुरुवात होईल तेव्हा गॅस बंद करावा.

  • आता पावडरचे पाणी या जेलमध्ये मिक्स करावे व एका कंटेनरमध्ये भरावे.

  • आठवडाभर या हर्बल शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्यावेत.

  • यातील पोषणतत्त्वांमुळे तुमचे केस काळेभोर, घनदाट आणि चमकादार होण्यास मदत मिळेल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT