Raw Milk Face Pack In Marathi Sakal
लाइफस्टाइल

त्वचा नितळ व सतेज होण्यासाठी कच्च्या दुधात मिक्स करा या गोष्टी, 7 दिवसांत चेहऱ्यावर येईल चमक

Raw Milk Face Pack In Marathi : घरच्या घरी उटणे कसे तयार करायचे व (how to make ubtan at home in marathi) याचा वापर करण्याची योग्य पद्धत, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया…

Harshada Shirsekar

Beauty Care Tips In Marathi : चेहऱ्याच्या त्वचेची निगा राखण्यासाठी नैसर्गिक औषधोपचारांवर विश्वास ठेवला जाऊ शकतो. कारण यामुळे त्वचेचा पोत खराब होत नाही, असे तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्वचा नैसर्गिक पद्धतीने एक्सफॉलिएट करण्यासाठी उटण्याचा वापर करणे हा एक सर्वोत्तम उपाय मानला जातो.

उटण्यामध्ये नैसर्गिक घटक उदाहरणार्थ हळद, केशर आणि बेसन यासारख्या गोष्टींचा समावेश केला जातो. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे त्वचा उजळण्यास मदत मिळू शकते. सोबतच त्वचेवर जमा झालेली घाण, अतिरिक्त तेल इत्यादी समस्या दूर होण्यासही मदत मिळते.

चेहऱ्यावरील मुरुमांची (Pimples Home Remedies In Marathi) समस्याही कमी होते. महत्त्वाचे म्हणजे त्वचा एक्सफॉलिएट करण्याचा हा रामबाण उपाय आहे. जाणून घेऊया घरच्या घरी उटणे (how to make ubtan at home) कसे तयार करायचे.

उटणे तयार करण्यासाठी आवश्यक असणारी सामग्री  (Ingredients needed to make Ubtan at home)

  • बेसन - दोन मोठे चमचे

  • हळद - अर्धा चमचा

  • दुधामध्ये भिजवलेली चिमूटभर केशर  

  • मध - एक चमचा  

  • गुलाब पाणी

चेहऱ्यावर उटणे लावण्याची योग्य पद्धत (how to apply ubtan on face in marathi)

उटणे चेहऱ्यावर लावण्यापूर्वी सर्वप्रथम चेहरा व मानेचा भाग स्वच्छ धुऊन घ्यावा. यानंतर चेहरा व मानेवर उटणे लावा व गोलाकार दिशेमध्ये हलक्या हाताने चेहरा व मानेचा मसाज करावा. जवळपास १५ ते २० मिनिटे उटणे चेहऱ्यावर लावून ठेवावे आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. चेहऱ्यावर नॅचरल ग्लो यावा याकरिता आठवड्यातून तिनदा हा उपाय करू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT