oily skin care tips news sakal
लाइफस्टाइल

चेहऱ्याची त्वचा नेहमीच चिकट-तेलकट असते का? जाणून घ्या Oily Skinची कशी घ्यावी काळजी

Oily Skin Care Tips: तुमच्याही चेहऱ्यावर नॅचरल ग्लोऐवजी केवळ चिकटपणा दिसत असेल तर ही समस्या दूर करण्यासाठी जाणून घ्या उपाय.

सकाळ डिजिटल टीम

Skin Care News : बहुतांश जणांच्या चेहऱ्याची त्वचा अतिशय तेलकट असते. आपली त्वचा तेलकट आहे, हे ओळखणे फार सोपे आहे. तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यानंतर चेहऱ्यावर चिकट थर दिसत असेल किंवा दिवसभरातही चेहऱ्यावर तेलकट थर जमा होत असले तर समजून जा की तुमची त्वचा तेलकट आहे. 

कधी-कधी कामाच्या गडबडीत वारंवार चेहरा स्वच्छ करणे कठीण होते, अशा परिस्थितीत चेहरा अधिकच तेलकट-चिकट दिसतो. तसंच त्वचा डिहाइड्रेटेड झाल्यासही त्वचेवर तेलाचा थर जमा होतो. पण काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तेलकट त्वचेची समस्या नक्की दूर होऊन तुमच्या चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येऊ शकतो. 

चेहरा वारंवार रगडू नये 

जेव्हा जेव्हा आपण चेहरा स्वच्छ करता त्यावेळेस चेहऱ्याची त्वचा हलक्या हाताने स्क्रब करावी. जास्त दाब देऊन त्वचा रगडू नये. यामुळे त्वचेचं नुकसान होते आणि त्वचा अधिक तेलकट होऊ शकते.

ऑइल फ्री प्रोडक्ट्सचा करा वापर  

आपली त्वचा तेलकट असेल तर स्किन केअर रूटीनमध्ये ऑइल फ्री प्रोडक्ट्सचा समावेश करावा. तेलकट त्वचेसाठीचे प्रोडक्ट्स वेगळे असतात, ज्यामुळे चेहऱ्याची त्वचा चिकट होत नाही. म्हणून तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपल्या त्वचेच्या प्रकारानुसारच प्रोडक्ट्सचा वापर करणे गरजेचं आहे. उदाहरणार्थ त्वचा तेलकट असल्यास सौम्य फेस वॉशचा वापर करावा. 

मॉइश्चराइझर लावणे टाळू नये  

त्वचा तेलकट असली तरीही मॉइश्चराइझर लावणे टाळले जाऊ नये.  मॉइश्चराइझरमुळे त्वचा  हाइड्रेटेड राहते. यामुळे त्वचा हेल्दी देखील राहण्यास मदत मिळते.  

मेकअप करताना घ्या विशेष काळजी  

ऑइल फ्री आणि लाइट मेकअप प्रोडक्ट्सचाच वापर करावा. योग्य प्रोडक्ट्सचा वापर न केल्यास चेहरा अधिक तेलकट आणि चिकट दिसेल. तसंच झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील मेकअप स्वच्छ करणेही गरजेचं आहे.  

चेहऱ्याला वारंवार स्पर्श करणे टाळावे  

चेहऱ्याला वारंवार स्पर्श करत राहिल्यास त्वचा अधिक तेलकट होते. यामुळे त्वचेवर दुर्गंध देखील जास्त प्रमाणात जमा होते. ज्यामुळे चेहऱ्यावर मुरुम येण्याची शक्यता वाढते. ही समस्या टाळण्यासाठी नेहमीच टीशू पेपरचा वापर करावा आणि चेहऱ्यावर अधिकचा जोर देऊन त्वचा रगडण्याची चूक करू नका. हलक्या हाताने चेहरा स्वच्छ करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

SCROLL FOR NEXT